Search This Blog

Sunday 6 June 2021

जिल्ह्यात 218 कोरोनामुक्त

 


जिल्ह्यात 218 कोरोनामुक्त, 85 पॉझिटिव्ह तर मृत्यू

चंद्रपूरदि.6 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 218 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 85 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

बाधित आलेल्या 85 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 16चंद्रपूर तालुका 10बल्लारपूर 8भद्रावती 11ब्रम्हपुरी 6 , नागभिड 3सिंदेवाही 2मूल 3सावली 1पोंभूर्णा 3गोंडपिपरी 1राजूरा 11चिमूर 0वरोरा 4कोरपना 6जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील 65 वर्षीय दोन महिलांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 83 हजार 586 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 80 हजार 533 झाली आहे. सध्या 1 हजार 574 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 91 हजार 844 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 4 हजार 866 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1479 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1369तेलंगणा दोनबुलडाणा एकगडचिरोली 39यवतमाळ 51भंडारा 11वर्धा एकगोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

 प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापरवारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावास्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावीव प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment