Search This Blog

Saturday 5 June 2021

कोविडमुळे पालक गमविलेल्या बालकांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी नियोजन करा - जिल्हाधिकारी गुल्हाने

 



कोविडमुळे पालक गमविलेल्या बालकांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी नियोजन करा - जिल्हाधिकारी गुल्हाने

Ø तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालकांसाठी 10 टक्के बेड राखीव

चंद्रपूरदि. 5 जून : कोरोनाच्या माहामारीत अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमाविले आहेत. यात अनेक बालके सुद्धा अनाथ झाली आहेत. या बालकांची योग्य काळजी आणि संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा बालकांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी योग्य नियोजन करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

बालकांची काळजी व संरक्षणासाठी असलेल्या कृती दलाच्या कामकाजाचा आढावा घेतांना ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरबालकल्याण समिती अध्यक्ष अॅड.वर्षा जामदारमहिला व बालकल्याण अधिकारी रमेश टेटेजिल्हा परीक्षा अधिकारी श्री. दडमलजिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकरस्थानिक गुन्हे शाखेच्या अपर्णा मानकरचाईल्ड लाईनचे समन्वयक अमोल मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.

कोविडमुळे पालक गमाविलेले बालके सध्या कुठे आहेतयाची माहिती त्वरीत घ्यावीअसे सांगून जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणालेही बालके त्यांच्या नातेवाईकांकडे की बालगृहात आहेयाची माहिती प्रशासनाला सादर करा. बालकांच्या पालकांचा मृत्यु कोविडमुळे झालायाची रुग्णालयाकडून खात्री करून त्यांचा कोविड पॉजिटिव असल्याचा रिपोर्ट पाहा. मृत्यु प्रमाणपत्रामध्ये कोविड़चा उल्लेख नसला तरी अहवालाला पॉजिटिव असल्याचा रिपोर्ट जोडणे आवश्यक आहे. पालक गमविलेल्या बालकांना कोणकोणत्या योजनांचा लाभ देऊ शकतोयाचे योग्य नियोजन कराअशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालकांसाठी 10 टक्के बेड रुग्णालयात राखीव ठेवले जातीलअसेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना अपर जिल्हाधिकारी वरखेड़कर म्हणाल्याजिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे असलेली बालकांची यादि प्रशासनाला त्वरीत पाठवा. तसेच सर्व तालुक्यांना पोर्टलवर माहिती भरण्याचा फॉरमेट वितरीत करा. उपलब्ध माहिती परिपूर्ण आहे की नाहीयाची खात्री करा. यासंदर्भातील कोणतेही प्रकरण लाभापासुन वंचित राहता कामा नये. मुलांची मदत करणाऱ्या व्यक्तिसंस्थांना शासनाच्या निर्देशानुसार मार्गदर्शन करा. महानगरपालिका क्षेत्रातील बालकांची यादी वेगळी ठेवाजेणेकरून त्यांना शहरी भागातील योजनांचा लाभ मिळू शकेलअसे त्या म्हणाल्या.

सध्यास्थितीत कोविडमुळे पालक गमावलेल्या 64 बालकांची यादी प्राप्त झाली आहे. यात ते वयोगटातील 19 बालके, 6 ते 18 वयोगटातील 42 बालके आणि 18 वर्षा वरील बालकांचा समावेश आहे. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या बालकांमध्ये चंद्रपूर येथील दोनचिमूर तालुक्यातील दोन आणि सावली तालुक्यातील एक बालक आहे. प्रतीपालक किंवा प्रायोजक तत्त्वावर बालकांना मदत करणाऱ्या व्यक्ति किंवा संस्थानी महिला व बालविकास विभागासोबत संपर्क करावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

000000000

No comments:

Post a Comment