Search This Blog

Saturday 5 June 2021

24 तासात जिल्ह्यात 175 कोरोनामुक्त

 


24 तासात जिल्ह्यात 175 कोरोनामुक्त, 123 पॉझिटिव्ह तर मृत्यू

चंद्रपूरदि.5 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 175 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 123 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

आज (दि.5) एकूण 4107 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 123 पॉझिटिव्ह तर 3984 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. बाधित आलेल्या 123 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 29, चंद्रपूर तालुका 17, बल्लारपूर 31, भद्रावती 3, ब्रम्हपुरी 5, नागभिड 0, सिंदेवाही 2, मूल 7, सावली 0, पोंभूर्णा 4, गोंडपिपरी 3, राजूरा 7, चिमूर 0, वरोरा 6, कोरपना 5, जिवती 1 व इतर ठिकाणच्या 3 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरातील 57 वर्षीय पुरुषसुंदर नगर परिसरातील 77 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 83 हजार 501 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 80 हजार 315 झाली आहे. सध्या 1 हजार 709 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 87 हजार 806 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 982 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1477 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1367, तेलंगणा दोनबुलडाणा एकगडचिरोली 39, यवतमाळ 51, भंडारा 11, वर्धा एकगोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापरवारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावास्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावीव प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

 

00000

No comments:

Post a Comment