Search This Blog

Thursday 3 June 2021

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Ø विविध विभागाचा घेणार आढावा

चंद्रपूर दि. 3 जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 4 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11:15 वाजता जिल्हा पोलिस ग्राउंड, चंद्रपूर येथे नवीन रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर (ता. सावली) येथील टोलनाक्यासाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनीसंदर्भात आढावा बैठक. दुपारी 12 वाजता कोटगल बॅरेज प्रकल्पांतर्गत अधिग्रहित करण्यात येत असलेल्या जमिनीचा मोबदला मिळणेबाबत आढावा बैठक.

दुपारी 12:30 वाजता खरीप हंगामात खते व बी-बियाणे सुरळीत पुरवठा होणेबाबत उत्पादक कंपनी संबंधित अधिकारी व सहकारी संस्था यांची आढावा बैठक. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सिंदेवाही येथील कृषी संशोधन केंद्र यांनी सादर केलेल्या प्रक्षेत्र विकास प्रकल्पाच्या मंजुरीबाबत आढावा बैठक. दुपारी 1:30 ते 2 वाजता राखीव वेळ राहील. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सिंदेवाही, मूल व चिमूर तालुक्यातील जबरान धारकांच्या समस्येबाबत वने व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक.

दुपारी 3 वाजता पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक. सायंकाळी 4 वाजता कोविड व म्युकरमायकोसिस संदर्भात आढावा बैठक. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून गडचिरोली कडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment