Search This Blog

Monday 14 June 2021

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा - वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

 


चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा - वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

Ø  डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत रुपये 50 कोटींची

तरतूद असलेल्या प्रस्तावावर लवकर निर्णय घेण्याच्या सूचना

मुंबई,चंद्रपूर दि. १४ :- चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत बहुतांश क्षेत्र जंगलव्याप्त असल्याने जंगलालगतच्या गावांत हिंस्र प्राण्यांचा वावर अधिक आहे. मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात जैवीक व वित्तीय हानी झालेली आहे. शेतपिकांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रानटी डुक्कर बाबतच्या धोरणात बदल करून

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा असे निर्देश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

चंद्रपूर जिल्ह्यात  वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान व मानव पशुहानीबाबत प्रलंबित नुकसान भरपाईबाबत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंत्री वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत बहुतांश क्षेत्र जंगलव्याप्त असल्याने जंगलालगतच्या गावांत हिंस्र प्राण्यांचा वावर अधिक आहे. या परिसरात एकूण 85 वाघ असून आजतागायत 51 गावांत वाघांचे हल्ले झाले आहेत. या हिंस्र प्राण्यांना आळा  घालण्याच्या दृष्टीने ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत गावालगतच्या जंगलव्याप्त क्षेत्रास जाळीचे कुंपण करण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत रुपये 50 कोटींची तरतूद असलेला प्रस्तावावर लवकर निर्णय घ्यावा. तसेच, वाघाच्या हल्यात  आतापर्यंत 19  नागरिकांचा मृत्यू झाला असून  69 नागरिक जखमी झाले आहेत. हंगाम सुरु झाला असून वन्यप्राण्यांच्या हल्यात जखमी झालेल्यांना लवकर पैसे देण्याचे सूचित करून सौरऊर्जा कुंपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

000000

1 comment:

  1. it's really a good one, very interesting blog, keep on share like this. Thank you.

    Best Air hostess Training Institute in Chennai

    ReplyDelete