Search This Blog

Monday 30 March 2020

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा

चंद्रपूर,दि.30 मार्च: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहने व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर संबंधित वाहनधारकांना अर्ज करता येईल.
जिल्ह्यामध्ये लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे औषधी दुकानेदूध,भाजीपाला,अन्नधान्य इत्यादी विविध जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे.परंतु,या वाहतुकीसाठी संबंधित वाहन धारकास प्रशासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस  आरटीओ तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत अशा वाहनांना ई-पास देण्यात येत आहे. ही  ई-पास ऑनलाईन असल्याने covid19.mhpolice.in या संकेत स्थळावर जाऊन संबंधितांनी अर्ज करून आपले ई-पास प्राप्त करून घ्यावे. प्राप्त अर्जाची पडताळणी करून संबंधित वाहनधारकांना ऑनलाइन प्रणाली वरूनच डाउनलोड करता येणार आहे. ई-पास च्या माध्यमातून वाहनधारक वाहतूक करू शकणार आहे.

जिल्ह्यातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहनधारक व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था  व्यक्ती covid19.mhpolice.in या संकेतस्थळावरून ई-पास साठी अर्ज करू शकतात. याठिकाणी सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर टोकन आयडी प्राप्त होतो. नंतर याचा वापर अर्जाची स्थिती तपासण्यासाठी करता येणार आहे.पोलीस यंत्रणेच्या मान्यतेनंतर टोकन आयडी वापरून ई-पास डाऊनलोड करता येईल.
या असणार ई-पासच्या सुविधा:
ई-पास मध्ये अर्जदाराची माहितीवाहन क्रमांकवैधता तारीख आणि क्यूआर कोड असणार आहे. प्रवास करताना ई-पासची सॉफ्ट तसेच हार्ड कॉपी जवळ ठेवावी.
वैध तारखेनंतर त्याचा वापर किंवा अन्य प्रकारे गैरवापर केल्यास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.
ई-पासच्या अधिक माहितीसाठी,मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर संपर्क करावा.
00000

No comments:

Post a Comment