Search This Blog

Monday 30 March 2020

घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करू या यंदा कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारुया – ना. विजय वडेट्टीवार


चंद्रपूर,दि.24 मार्च : यंदा मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असल्याने  गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी घराबाहेर जाऊ नकाघरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा,असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले असून नागरिकांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्याचे स्वागत करण्यासाठी दारावर तोरण हमखास लावले जाते. त्याशिवाय गुढी उभारून तिला साखरगाठ्यांची माळ घातली जाते. सोनेखरेदीकपडे खरेदीही केली जाते. मात्रया खरेदीसाठी यंदा घराबाहेर पडू नये. असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले आहे. राज्यात संचारबंदी लागू आहे.या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याला खरेदीसाठी बाहेर जाऊ नकाखरेदीसाठी रस्त्यावर गर्दी केली तर कोरोनापासून संरक्षणासाठी उचलण्यात येत असलेल्या कठोर उपाययोजनांचा उपयोग होणार नाहीयाचीही जाणीव त्यांनी करून दिली आहे.
यंदा मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असले तरी घरोघरी गुढ्या उभारल्या जातील. परंतु, शोभायात्रांचं आयोजन व सामुहिक आयोजन टाळण्याचं आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
साखरेच्या गाठी स्वतःच घरी तयार करा,घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा मात्र बाजारात गर्दी करू नकाबत्ताश्यांऐवजी घरातच गोड पुऱ्या करून त्यांचा हार गुढीला घालता येईल. पूर्वी घरोघरी श्रीखंड घरातच तयार करत असत. तोच कित्ता पुन्हा गिरवता येईलअशा आठवणीही त्यांनी जागवल्या. नागरिकांनी यंदा कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावीअसं आवाहनही त्यांनी  केले  आहे.
00000

No comments:

Post a Comment