Search This Blog

Monday 30 March 2020

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – ना. विजय वडेट्टीवार

कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटींचा निधी
चंद्रपूर,दि.21 मार्च : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे पसरलेल्या आजारावर नियंत्रित करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना 45 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला आहे असे आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढे म्हटले की     (कोविड- 19) विषाणूच्या राज्यातील वाढता फैलाव लक्षात घेता मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे येणारा निधी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर आयुक्तजिल्हाधिकारी आणि  संबंधित विभागाचे अधिकारी  यांची चर्चा केली.  मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकरआपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी चर्चा करून  तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले.  त्यानुसार विभागीय आयुक्तांना 45 कोटी इतका निधी नुकताच वितरित करण्यात आलेला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती  आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली
          विभागवार माहिती देताना आपत्ती  व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  सांगितले कीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोकण विभागासाठी 15 कोटीपुणे विभागासाठी 10 कोटीनागपूर विभागासाठी 5 कोटीअमरावती विभागासाठी 5 कोटीऔरंगाबाद विभागासाठी 5 कोटी,  नाशिक विभागासाठी 5  याप्रमाणे एकूण 45 कोटींचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे.
या निधीमधून  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणेतात्पुरती निवासी व्यवस्था करणेअन्नकपडे वैद्यकीय देखभालनमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी,छाननीसाठी सहाय्यकॉन्टॅक्ट  ट्रसींग शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तूअग्निशमनपोलीसस्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटीलेटरहवा शुद्धीकरण यंत्रथर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी हा निधी देण्यात आले असल्याची माहिती आपत्ती  व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली
        कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सर्वांनीच एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे,  कार्पोरेट क्षेत्रातील मान्यवर नेहमीच राज्यातील अनेक संकटाच्या वेळी मदतीसाठी पुढे आले आहेत यावेळीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रीत करण्यासाठी मंत्रालय आणि शासकीय कार्यालयबसेसएसटी बसेसओला उबेर या शासकीय आणि खाजगी परिवहनाचे  निर्जंतुकीकरण करनेटेस्टिंग किट उपलब्ध करून देणेप्रयोगशाळांची संख्या वाढवणे या अनुषंगाने  कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीत  (सी.एस.आरव इतर माध्यमातून  मदत करण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. 
    राज्यात थैमान घातलेल्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही  असे आश्वासन  देत राज्यातील जनतेने काळजी घ्या सतर्क राहा असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी  केले.
00000

No comments:

Post a Comment