Search This Blog

Monday, 30 March 2020

निकृष्ट दर्जाचे मासे विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

चंद्रपूरदि. 30 मार्च: जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन असून या काळामध्ये निकृष्ट दर्जाचे मासे विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.
अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर या कार्यालयास प्राप्त तक्रारीच्या आधारे कार्यालयातील अन्नसुरक्षा अधिकारी अ.या. सोनटक्के यांनी दिनांक 30 मार्च रोजी चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प भागातील मच्छी विक्रेत्यांची तपासणी केली.सदर तपासणीमध्ये राम मंदर बिस्वास हा मासे विक्रेता निकृष्ट दर्जाचे मासे ज्यामधून दुर्गंध येत होता अशा माशांची विक्री करीत असल्याचे आढळून आले.
सदर मासे खाण्यास अयोग्य असल्याने एकूण रुपये 1 हजार 200 किमतीचे मासे अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 38 (4) अन्वये कारवाई करण्यात आली असून हे मासे डंपिंग यार्ड येथे नेवून नष्ट करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थाची साठवणूक व विक्री करू नये तसे करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईलअशी माहिती प्रसिद्धीपत्रकात सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन,चंद्रपूर नितीन मोहिते यांनी दिली.
00000

No comments:

Post a Comment