Search This Blog

Monday 30 March 2020

रस्त्यावरची गर्दी कमी करा ;आजपासून पोलिस सक्त कारवाई करणार

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाची तयारी
Ø  मनपा शाळांमध्ये गरज पडल्यास कम्युनिटी किचन
Ø  विदेशातून आलेले 45 नागरिक निगराणीखाली
Ø  आतापर्यंतचे सर्व नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह
Ø  कामावरच्या सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना मिळणार नियमित पगार
Ø  शहरातील सर्व होर्डिंगवर फक्त कोरोना संदर्भातील सूचना
Ø  स्वयंसेवी संस्थांमार्फत तयार जेवणाची व्यवस्था
Ø  नागरी व ग्रामीण क्षेत्रात होणार निर्जंतुकीकरण
Ø  जिल्ह्यात होणार मांस विक्री सुरू
Ø  सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती
Ø  खाजगी डॉक्टरांनी आपले रुग्णालय सुरू करण्याचे आवाहन
Ø  विनाकारण फिरणाऱ्या 46 नागरिकांवर कारवाई
Ø  शहरातील आशा कार्यकर्त्या व सर्वे करणाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन
Ø  फक्त बेघर लोकांनाच एक वेळ अन्न पुरविल्या जाणार
Ø  रेशन कार्ड असलेल्यांनी रेशन दुकानातून अन्नधान्य घेण्याचे आवाहन
Ø  अन्य राज्यातील नागरिकांनी घाबरू नये प्रशासन त्यांच्याही पाठीशी
Ø  आरटीओ मार्फत जीवनावश्यक पुरवठा वाहनांना देणार परवाना
Ø  महानगरपालीकेकडे निराश्रित म्हणून नोंद झालेल्यांनाच एकवेळ मोफत पार्सल
चंद्रपूर,दि. 27 मार्च : पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे असून  घराबाहेर  न पडण्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था प्रशासन करत आहे. जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था देखील या कामी पुढे आल्या असून  वेगवेगळ्या क्षेत्रातील  नागरीकांचा यासाठी पाठबळ मिळत आहे. पोलीस प्रशासनाने रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या 46 जणांवर गुन्हे दाखल केले असून उद्यापासून आणखी कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र पुढील काळात घरामध्ये राहणे योग्य राहीलअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
दरम्यान जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत विदेशवारी करून आलेल्या व नोंद झालेल्या नागरिकांची संख्या 106 असून सध्या 45 नागरिक निगराणीत आहे. 61 नागरिकांनी 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केले आहे. या सर्व नागरिकांची तपासणी निगेटिव्ह आली आहे सध्या कोणताही तपासणी अहवाल पेंडिंग नसून नागरिकांनी पुढील 14 तारखेपर्यंत घराबाहेर पडू नये कोरोना विषाणू संसर्गाची चेन तोडावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिके मार्फत जिल्ह्यामध्ये निराश्रितबेघर लोकांची यादी तयार करणे सुरू आहे. ज्यांच्याकडे जेवण तयार करण्याची यंत्रणाच नाहीबेघरनिराश्रित आहेअशाच नागरिकांना स्वयंसेवी संस्थांमार्फत व महानगरपालिकेमार्फत तयार अन्न पुरवले जाणार आहे. यासाठी एकत्रित जुबिली हायस्कूल या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत कम्युनिटी किचन उभारले जाणार आहे. याशिवाय शहरातील स्वयंसेवी संस्थांमार्फत देखील तयार झालेले अन्न वाटप करण्यात येणार आहे. मात्र वितरणाची यंत्रणा महानगरपालिका राबविणार आहे.
यासंबंधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार व महापौर राखी कंचर्लावार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार तसेच जिल्ह्यातील मेडिकल असोसिएशनसामाजिक संस्थांचे संस्थापक प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पुरवठा संदर्भात सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी शासकीय कर्मचारी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरातील माहिती येत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी या शासकीय कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक न दिल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या बैठकीमध्ये सर्व स्वयंसेवी संस्थातसेच धान्य व किराणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी असे आवाहन केले की, शहर व ग्रामीण भागात आशा वर्कर महानगरपालिका कर्मचारी यांच्यामार्फत सुरू असणाऱ्या सर्वेक्षणाला सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. शहराच्या आरोग्य व्यवस्थेला आणखी बळकट करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून ही मंडळी काम करत असून त्यांना योग्य माहिती व योग्य सन्मान द्यावाजिल्ह्यामध्ये स्वयंसेवी संस्थांमार्फत निराश्रित व गरजू नागरिकांना तयार जेवणाची व्यवस्था करण्यात येईल,असे विविध स्वयंसेवी संस्थांचे संस्थापक प्रतिनिधींनी आपले मत मांडले. त्याचप्रमाणे शहरातील बेघर लोकांची यादी तयार करण्याचे काम मनपामार्फत सुरू करण्यात आले आहे.
चंद्रपूर एमआयडीसीमध्येच सॅनीटायझर तयार करण्यासाठी काही उद्योग समूहांना आवाहन करण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी अनेक आस्थापना आम्ही बंद करायला सांगितले. तरी त्यांना या काळात पगार मात्र बंद करू नयेअसे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
शहरातील मनपा शाळांमध्ये तसेच ज्युबिली हायस्कूलमध्ये गरज पडल्यास कम्युनिटी किचन सुरू होईलअसा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.
शहरातील सर्व होर्डिंगवर फक्त कोरोना जनजागृती विषयक सूचना देण्यात येणार आहे. तसेच शहरातील बीपीएल शिधापत्रिका धारकांना आजपासून 1 महिन्याचे धान्य वाटप सुरू केले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील परवापासून अन्नधान्य वाटपाला सुरुवात होणार आहे. आपल्या रेशन कार्डवर हे अन्नधान्य मिळणार असून रेशन दुकानापर्यंत जाण्यासाठी आपले ओळखपत्र सोबत ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरी व ग्रामीण क्षेत्रात होणार निर्जंतुकीकरण:
कोरोना विषाणू (कोविड-19) प्रतिबंधाकरिता नागरी व ग्रामीण क्षेत्रातील शासकीय कार्यालयसार्वजनिक संस्थासार्वजनिक बागासर्व शाळाकॉलेजबस स्टँड,रेल्वे स्टेशन,सिनेमागृह,नाट्यगृह,हॉटेसार्वजनिक वाचनालय इत्यादी सर्व ठिकाणी 1 टक्का हायपोक्लोराईट सोलुशन किंवा 5 टक्का हायपोक्लोराईट सोलुशन या (1:4) प्रमाणे एक लिटर व हायपोक्लोराईट सोलुशन व 4 लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून बॅक सॅकद्वारे फवारणी किंवा 2.5 सोल्युशन द्वारे फवारणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात होणार मांस विक्री सुरू:
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. परंतुया संचारबंदीच्या कालावधीत मांस विक्री सुरू राहील असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे.
मांस विक्रीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याकरिता मांस विक्रीधारकांस एका वेळेस 2 पेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाही,याची दक्षता देण्यासंबंधी निर्देश देण्यात यावे. तसेच 2 ग्राहकांमध्ये 1 मीटरचे अंतर ठेवण्याकरिता 1 मीटर अंतरावर चौकोनी सीमांकन करण्यात यावे. त्याचप्रमाणे त्यांनी सॅनीटायझर,साबणाने हात धुण्याची व्यवस्था राहील याची खबरदारी घेण्यात यावी. मांस विक्रेत्यांकडून सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची खबरदारी घेण्यात यावी याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे.
सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती:
कोरोना विषाणु प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांची अतितातडीची कामे व प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यासाठी त्यांचे कार्यक्षेत्रामध्ये इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती करीत आहे. त्यांनी इतर विभागांशी समन्वय ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे. उपविभागीय अधिकारीतहसीलदार यांचे कार्यक्षेत्रांमधील इतर विभागांचे अधिकारी,कर्मचारी हे उपविभागीय अधिकारीतहसीलदार यांचे नियंत्रणाखाली कोरोना विषाणूचे संसर्गात वाढ होऊ न देता करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याकरिता त्यांचे निर्देशानुसार कामकाज करतील.
       दरम्यान महानगरपालिका हद्दीमध्ये उभे असलेल्या सर्व होर्डिंगवर फक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भातील जनजागृतीचे फ्लेक्‍स लागतील. अशा पद्धतीच्या फ्लेक्‍स लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावेज्या होर्डिंग मालकाकडून हे सहकार्य होणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईलअसे निर्देश महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले आहेत.
आरटीओ मार्फत जीवनावश्यक पुरवठा वाहनांना देणार परवाना :
सध्या लागू असलेल्या संचारबंदीमुळे वाहनधारकांना परिवहन कार्यालयात येणे अडचणीचे होत आहे. परिवहन कार्यालयाची गर्दी टाळण्यासाठी तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना सोयीचे व्हावे म्हणून प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाचे इमेल वर असे अर्ज स्वीकारावेत हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर नमूद वाहनात तात्काळ प्रमाणपत्र जारी करावी व त्यांची नोंद स्वतंत्र नोंदवही ठेवावी. जारी केलेले प्रमाणपत्र अर्जदाराचे इमेल वरती स्कॅन करून पाठवावे व प्रमाणपत्रावर स्कॅन कॉपी सेंट फ्रॉम ऑफिस अशी टीप टाकावी. अशी माहिती परिवहन उपआयुक्त(प्रशासन)जितेंद्र पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा आरोग्य संबंधित त्रास निर्माण झाल्यास त्यांनी त्वरित  जिल्हा सामान्य रुग्णालय        07172-270669जिल्हा परिषद आरोग्य विभाग 07172-261226चंद्रपुर महानगरपालिका 07172-254614 व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 07172-251597 किंवा टोल फ्री क्रमांक 1077जिल्हा पोलिस यंत्रणेने देखील आपले क्रमांक जाहीर केले असून पोलीस यंत्रणेशी संपर्क साधायचा असल्यास 07172-273258,263100 या प्रमुख  क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

No comments:

Post a Comment