Search This Blog

Tuesday, 31 March 2020

लॉकडाऊनमध्ये शाळेची फी जमा करण्यातून सूट

चंद्रपूर,दि. 31 मार्च: राज्यामध्ये 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असल्याने या कालावधीमध्ये शाळेची फी जमा करण्यातून सूट देणेबाबत राज्य शासनाने एक परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे.
राज्यातील कोरोना साथीची सध्याची परिस्थिती, लॉकडाऊन केल्यामुळे संपूर्ण हालचालीवर घालण्यात आलेली बंदी पर्यायाने नागरिकांना जाणवणारी पैशांची उपलब्धता या बाबी विचारात घेता सर्व बोर्डाच्यासर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विनंती करण्यात येते कीविद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी गोळा करताना सहानुभूती दाखविणे आवश्यक राहील.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सदर फी जमा करण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये. लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर शाळेची फी जमा करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्याची कार्यवाही करावी.अशी माहिती राज्य शासनाने परिपत्रक जारी करून दिली आहे.
00000

No comments:

Post a Comment