Search This Blog

Monday 30 March 2020

मोफत धान्य वाटपाबाबत जनतेमध्ये कोणीही संभ्रम निर्माण करू नये : राजेंद्र मिस्कीन

चंद्रपूर,दि. 29 मार्च: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काही लोक गरजू व गरीब लोकांकडून आधारकार्ड गोळा करून त्यांना मोफत धान्य मिळवून देण्याचे आमिष दाखवत आहेत. अशा तक्रारी चंद्रपूर शहर व जिल्ह्यातून प्राप्त होत असून बऱ्याच लोकप्रतिनिधींकडून व सामान्य जनतेकडून प्रशासनाकडे मोफत धान्याबाबत विचारणा होत आहे.
मोफत धान्य वाटपाबाबत शासनाकडून कोणतेही निर्देश आजमितीस जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेले नाहीत.त्यामुळे मोफत धान्य वाटपाबाबत जनतेमध्ये कोणीही संभ्रम निर्माण करू नये. तसेच जनतेने सुद्धा प्रशासनाकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे मोफत धान्याबाबत चौकशी करू नये. मोफत धान्य वाटपाबाबत शासनाकडून आदेश आल्यास त्याबाबत योग्य वेळी प्रसिद्धी देऊन वाटप करण्यात येईल.
अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकात जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिली आहे.
शासन आदेशानुसार जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या रेशन कार्डधारकांना माहे एप्रिल,मे व जून 2020 या तीन महिन्यांचे धान्य वितरणाचे आदेश जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना देण्यात आले असून कार्डधारकांनी त्यांचेशी संबंधित दुकानातून एकाच वेळी महिन्याचे धान्याची उचल करावी. धान्य घेतेवेळी स्वस्त धान्य दुकानात गर्दी होणार नाही व व्यक्ती मध्ये मीटरचे सुरक्षित अंतर राहील याची सर्वांनी दक्षता घेण्यात यावीअसे आवाहन देखील जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment