Search This Blog

Monday 30 March 2020

जिल्ह्यांमध्ये आजपासून संचारबंदी ; कोणत्याच वाहनांना परवानगी नाही


अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आवाहन
Ø  रस्त्यावर फक्त परवानगी असलेली वाहने धावतील
Ø  जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी वाहनांचा वापर करता येणार नाही
Ø  पेट्रोल फक्त अत्यावश्यक सेवांसाठी
Ø  होम कॉरेन्टाईनची माहिती आपत्ती निवारण कक्षातून घेतली जाणार
Ø  गावातील होम कॉरेन्टाईनची माहिती पोलीस पाटलांनी शासकीय यंत्रणेला द्यावी
Ø  निराधार कुटूंबांना जिल्हा पुरवठा विभागामार्फत अन्नधान्य पुरवठा करणार
Ø  ऑटोटॅक्सीदुचाकी वाहने रस्त्यावर धावणार नाही
Ø  गेल्या 7 दिवसात शहरात कोणत्याही मार्गाने येणाऱ्या सर्वांची होणार तपासणी
Ø  स्वतःला होम कॉरेन्टाईन करून कुटुंबाला देखील सुरक्षित ठेवण्याचे आवाहन
Ø  अत्यावश्यक सेवा प्रसारमाध्यमांसाठी काम करणाऱ्यांनी गळ्यात ओळखपत्र ठेवावे
चंद्रपूर,दि.23 मार्च : कोरोना (कोविड-19)  विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सक्त  पाऊले उचललेली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांमध्ये आजपासून संचारबंदी लागू होणार आहेअशी घोषणा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केली आहे. उद्यापासून रस्त्यावर कोणतीही वाहने सुरू राहणार नाही. तसेच कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनंतर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सर्व विभाग प्रमुखांची व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या बैठकीमध्ये उद्या संचारबंदी लागल्यानंतर आरोग्य उपयोजने संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच या काळात नागरिकांना घरीच ठेवताना येणाऱ्या अडचणी बद्दल चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यामध्ये सरकारीमालवाहतूकपोलीसआरोग्य,प्रसार माध्यमे संदर्भातील वाहने या अत्यावश्यक सेवांसाठीच्या वाहनांना पेट्रोल मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. अत्यावश्यक सेवा म्हणून काम करणाऱ्या सर्व लोकांनी आपले ओळखपत्र दर्शनी ठेवावेपोलिसांना सहकार्य करावे ,असे आवाहनही करण्यात आले आहे.
रस्त्यावर फक्त  कार्यालय प्रमुखाचे व आस्थापना प्रमुखाचे वाहनांचा समावेश असलेले वाहने धावतील. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वाहने वापरता येणार नाही.यासाठी  नागरिकांना पायीच जावे लागेल ,असे सक्त निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
औद्योगिक प्रतिष्ठाने फक्त मर्यादित स्वरूपात सुरू राहतील. तसेच अत्यावश्यक सेवांमधील सर्व अधिकारीकर्मचारी यांनी गळ्यात ओळखपत्र ठेवूनच काम करावे लागणार आहे.
जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या कॉरेन्टाईनची कक्षाची नियमितपणे रोजची पाहणी केली जाणार असून या कक्षामध्ये सर्व सुविधा उपलब्ध केली जाईल. महानगरपालिका क्षेत्रात दोन तृतीयांश होम कॉरेन्टाईन आहेत. या सर्व होम कॉरेन्टाईन केलेल्या नागरिकांची नियमित पोलीस भेट देत आहे. प्रत्येक होम कॉरेन्टाईनची माहिती आपत्ती निवारण कक्षातून घेतली जाईल.
कॉरेन्टाईन विषाणू संसर्गच्या तिसऱ्या चरणाच्या उंबरठ्यावर सध्या आपण पोहोचले असून त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहे.गरजेच्यासाठी आकस्मिक साथ नियंत्रण आराखडा तयार करण्यात आला आहे .गेल्या 7 दिवसात ट्रॅव्हल्सद्वारे येणाऱ्या सगळ्यांना होम कॉरेन्टाईन करण्यात येणार आहे. गावातील सर्व नव्याने आलेल्या नागरिकांची माहिती पोलीस पाटलांनी सरकारी यंत्रणेकडे देण्याबद्दल बजावण्यात आले आहे. उद्यापासून जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून कोणतेही खाजगी वाहन ,टॅक्सी ,दुचाकी वाहनऑटो सर्व वाहने बंद ठेवण्यात येणार आहे. उद्याच्या संचारबंदी संदर्भात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सर्व धार्मिक संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना ध्वनिक्षेपकाचाद्वारे घरात राहण्याचे आवाहन करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले आहे.
या आजाराच्या संदर्भात प्रचार-प्रसार करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले असून सर्व खाजगी होर्डिंगवर देखील केवळ कोरोना संदर्भात प्रसिद्धी करण्यात यावीअसेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आपल्या आरोग्य संदर्भात कोणतीही भीती वाटल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय         07172-270669जिल्हा परिषद आरोग्य विभाग 07172-261226चंद्रपुर महानगरपालिका 07172-254614 व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 1077 या प्रमुख  क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
000000

No comments:

Post a Comment