Search This Blog

Monday 30 March 2020

चंद्रपूर येथे पुण्याहून आलेल्या रेल्वे प्रवाशांना केले होम क्वारंटाईन


जिल्हा व रेल्वे प्रशासनाची विशेष खबरदारी
चंद्रपूरदि. 22 मार्च : कोरोना (कोविड-19) विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाने 21 मार्चला पुण्याहून निघालेल्या सर्वच रेल्वेतील प्रवाशांना चंद्रपूर रेल्वेस्थानक येथे दिनांक 22 मार्च रोजी प्रवाशांची नोंदणी करुनथर्मल स्क्रीनींग करुनहोम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले.
21 मार्चला पुण्याहून आलेल्या सर्वच रेल्वेतील प्रवाशांना पोलीस बंदोबस्तात होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये, चंद्रपूर रेल्वे स्थानकावर एकूण 336 प्रवाशांचे सर्व प्रक्रियेनिशी होम क्वारंटाईन करून,कोरोना (कोविड-19) विषाणूंचा प्रसार होऊ नये व काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रक्रियेवेळी स्टेशन मास्तर के.एस.एन.मूर्तीजिल्हा व महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारीकर्मचारी तसेच राज्य व रेल्वे पोलिस उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 185 अलगीकरण  (क्वारंटाईन) कक्ष स्थापन केलेले आहेत.तर प्रत्येक तहसील ठिकाणी संबंधित तहसीलदार हे सुविधा कक्षातील संपर्क व्यक्ती असणार आहे. तसेच,चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनासंदर्भात अधिक माहितीसाठी व मदतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय 07172-270669, जिल्हा परिषद आरोग्य विभाग 07172-261226,चंद्रपुर महानगरपालिका 07172-254614 व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 1077 या प्रमुख  क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
00000

No comments:

Post a Comment