Search This Blog

Monday 30 March 2020

चौकशीसाठी येणाऱ्या आशा वर्कर व कर्मचाऱ्यांना योग्य माहिती दया : जिल्हाधिकारी

Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  जिल्हा सिमांवरील नाकेबंदी कडक करणार
Ø  घराघरातून योग्य माहिती द्या ;सहकार्य करा
Ø  निराश्रितांसाठी जिल्ह्यात 31 निवारा कक्ष
Ø  मुख्यमंत्री व प्रधानमंत्री सहायता निधीला मदत करा
Ø  जीवनावश्यक कारखाना कामगारांनी कामावर रुजू व्हा
Ø  डॉक्टरांनी रुग्णसेवेत स्वतःला झोकून देण्याचे आवाहन
Ø  किरायादाराचे 1 महिन्याचे भाडे उशिरा घेण्याचे आवाहन
Ø  विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 53 लोकांवर कारवाई
चंद्रपूर, दि. 30 मार्च : नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून आवाहन करतानाच जीवनावश्यक वस्तू त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी अतिशय गंभीरतेने प्रशासन प्रयत्न करत आहे. सध्या जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. रुग्ण वाढल्यास लॉक डाऊनचा कालावधी वाढू शकतोअसे संकेत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज दिले आहेत.
घरातील कोणी एका सुदृढ माणसाने या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंसाठी गरज असेल तरच ओळखपत्रासह बाहेर पडावे. अन्यथा कोणीही बाहेर पडून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालू नयेअसे आवाहन प्रशासन करत आहे. जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपाययोजना करताना नागरिकांनी गर्दीही करू नयेहे देखील बघावे लागत आहे.
दरम्यानजिल्ह्यांमध्ये आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. विदेशातून आलेल्या 28 लोकांना 14 दिवसांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत 95 नागरिकांनी 14 दिवसांचा होम कॉरेन्टाईन पूर्ण केले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. काल पाठवण्यात आलेल्या पैकी नमुने निगेटिव्ह आले. 1 नमुन्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
जिल्ह्याच्या सीमा सर्व बाजूंनी बंद करण्यात आल्या आहे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच छोट्याशा गावापासून तर चंद्रपूर सारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात आशा वर्कर आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करत आहेत. या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे जर कुणी आजारी असेल तर त्याची माहिती कळवावी. कोरोना हा आजार योग्य उपचाराने काही दिवसांच्या कालावधीत देखील संपूर्णतः बरा होऊ शकतो. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही उदाहरणे पुढे आली आहे. त्यामुळे वेळीच औषधोपचार व संपर्कात न येणे हेच यावरचे उपाय असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
      जिल्ह्यामध्ये सॅनीटायझर व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये यासाठी स्थानिक स्तरावरील सर्व कारखाने सुरू करण्याचे सांगितले आहे. प्रत्येक अत्यावश्यक आस्थापनावरील प्रमुख व्यक्तीने आपल्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देणे गरजेचे आहे. कामगारांना विनंती करण्यात येते कीज्या कामगारांचा संबंध जीवनावश्यक वस्तूंशी आहे. त्या सर्वांनी ओळखपत्र सोबत ठेवून कामावर पोहोचावे.
सध्या सर्वांना घरीच बसून राहण्याचे निर्देश दिले असल्यामुळे व व्यवहार बंद असल्यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या किरायेदाराकडून सध्याच घर मालकांनी किरायाची सक्ती करू नये. याचा अर्थ किराया माफ झाला असे नव्हे. तर केवळ या महिन्यासाठी घेऊ नयेहा किराया पुढील महिन्यात घ्यावा. यासोबतच त्याला घर खाली करायला सांगू नयेअसे निर्देश केंद्र शासनाकडून आले आहेत.
कोरोना आजारामुळे सध्या नागरिक दहशतीत आहेत.अशावेळी छोट्या-मोठ्या आजारांसाठी त्यांना वैद्यकीय सल्लाजुजबी उपचारही आवश्यक असतात. इंडियन मेडिकल असोसिएशनचे संबंधित सर्व डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू करण्याचे मान्य केले असून सर्वांनी रूग्ण सेवा सुरु करावीअसे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बाहेर राज्यातून अडकून पडलेले नागरिक, कामगार, मजूर यांनी कोणताही प्रवास न करता महानगरपालिकानगरपालिकाग्रामपंचायततसेच जिल्हास्तरावर सुरू करण्यात आलेल्या शेल्टर हाऊस अर्थात निवारा कक्षामध्ये आसरा घ्यावा. या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणतीही अडचण असल्यास वारंवार जाहीर करण्यात येणाऱ्या आवश्यक दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशभर कोरोना रुग्ण वाढत असताना काही नागरिक कोणतेही काम नसताना घराबाहेर पडत आहेत.त्या सर्वांना पुन्हा विनंती येते कीत्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी व कुटुंबासाठी घरातच राहणे योग्य राहील. पोलीस यासंदर्भात ओळखपत्र व आवश्यक माहिती घेऊन कार्यवाही करत आहे. आतापर्यंत 53 लोकांवर कार्यवाही झाली असून यापुढे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना ताब्यात घेण्यात येईलअसेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी व प्रधानमंत्री सहायता निधी साठी मोठ्या प्रमाणात दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदत करण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. यामाध्यमातून कोरोना संदर्भात लोकोपयोगी कामे हाती घेतली जात आहे. ही लढाई आणखी काही दिवस चालणार असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावेअसेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment