Search This Blog

Tuesday 31 March 2020

नोंदणीकृत संस्था,न्यास यांनी प्रधानमंत्री सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा : चंदा ढबाले

चंद्रपूरदि. 31 मार्च : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत महत्वपूर्ण पाऊल उचलले असून सर्व देशांमध्ये लॉकडाऊन केले आहे.गरीबकष्टकरीमजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी व आवश्यक औषधोपचार पुरविण्यासाठी प्रधानमंत्री सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था व न्यास यांनी मदत करण्याचे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त चंदा ढबाले यांनी केले आहे.
मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. यामध्ये धनादेश,डीडी अथवा ऑनलाईन निधी देऊ शकता.
या खात्यामध्ये जमा करता येणार मदत:
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19,बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया,मुंबई मुख्य शाखाफोर्टमुंबई 400023,शाखा कोड 00300 आयएफएससी कोड SBIN0000300 या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी मदत करता येणार आहे. सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
लॉकडाऊनच्या बंधनास अधीन राहून तसेच कोरोना प्रसार प्रतिबंध करण्यासाठीच्या आवश्यक त्या आरोग्यविषयक मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय चंद्रपूर अंतर्गत नोंदणीकृत सर्व संस्था व न्यास तसेच धर्मादाय रुग्णालय यांना आवाहन करण्यात येते की,गरीब व कष्टकरी तसेच मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य आणि औषधोपचार पुरविण्यात यावे. तसेच रक्तदान शिबिर आयोजित करावे. आणि पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये आर्थिक स्वरूपात मदत करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास पाठविण्यात यावा असेही सहायक धर्मादाय आयुक्तांनी आवाहन केले आहे.
00000

No comments:

Post a Comment