Search This Blog

Monday 30 March 2020

कोरोना (कोविड-19) विषाणू प्रतिबंधात्मक राज्य व जिल्हा नियंत्रण कक्षासाठी मानक कार्यपद्धती

द्रपूर,दि.25 मार्च: राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, दिल्ली यांच्याकडून कोरोना  (कोविड-19) विषाणू  प्रतिबंधात्मक राज्य व जिल्हा नियंत्रण कक्षासाठी मानक कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे.
डब्ल्यूएचओने सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. (कोविड-19) विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी व त्याच्या अंमलबजावणीवर नजर ठेवण्यासाठी राज्य व नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
या नियंत्रण कक्षाचे प्रमुख राज्य आरोग्य विभाग अधिकारीराज्य सर्विलन्स अधिकारीनियंत्रण कक्ष प्रभारी संबंधित कामांवर देखरेख करतील. सर्विलन्स टिमकॉल सेंटर व्यवस्थापन टीममिडीया सर्विलन्स टीम सॅम्पल ट्रेसिंग टीमखाजगी रुग्णालय सर्विलन्स टीमवाहतूक आणि ॲम्बुलन्स व्यवस्थापन टिम, इंटर डिपार्टमेंटल अॅंड को-ऑर्डिनेशन टिम या प्रमुख टीम राज्य व जिल्ह्यामध्ये काम करणार आहेत.
असे असणार या टीमचे कार्य:
सर्विलन्स टिममध्ये रुग्णालय सर्विलन्स असणार आहे. यात रूग्णालयामध्ये दाखल झालेल्या लक्षणे ग्रस्त रुग्णांच्या स्थितीची बारकाईने छाननी केली जाईल आणि अहवालाचे परीक्षण केले जाईलफिल्ड सर्विलन्स यामध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांवर संबंधित पीएचसी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून देखरेख केल्या जाईल. परदेशातून तसेच बाहेरून आलेल्या प्रवाशी नागरिकांना 14 दिवस घरातच राहणे गरजेचे असून यावर लक्ष ठेवुन राहणार आहे.
कॉल सेंटर व्यवस्थापन टीम अंतर्गत सर्व राज्यातील जिल्ह्यामधील संबंधित विभागांशी संपर्क साधतील. व दररोज 6 वाजता कामकाजा संबंधित अहवाल सादर करतील.राज्यात व जिल्ह्यातही नियंत्रण कक्ष कॉल सेंटर सुरू केले आहे. कॉल सेंटरवर 3 लॅपटॉप, 3 मोबाइल / लँडलाईन टेलिफोन सुविधा सह स्थापित केले आहे. प्रत्येक कॉल सेंटर ऑपरेटरला टेलिफोन व संगणक दोन्ही असावे. प्रलंबित कॉलना उत्तर देण्यासाठी एक आउटगोइंग मोबाइल सुविधा देखील उपलब्ध आहे. कंट्रोल मॅनेजमेंट रूममध्ये दोन व्हॉट्सअ‍ॅप नंबरही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
मिडीया सर्विलन्स टीम अंतर्गत माहितीचे प्रमाणीकरण करणे आणि वेळेवर प्रतिबंधात्मक आणि नियंत्रण उपाय योजना कार्यान्वित करणे,सॅम्पल ट्रेसिंग टीममध्ये सर्व जिल्ह्यांमधून प्रत्येक प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यावर लक्ष ठेवणे आणि पीएच प्रयोगशाळेत समन्वयाने नमुने पाठविण्याबाबतचे सर्व प्रश्नांची उत्तरे देणे यावर राज्य टीम काम करणार आहे.
खाजगी रुग्णालय सर्विलन्स टीम अंतर्गत सर्व जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांना भेट  देऊन रुग्णालयातील सामान्य लोकांविषयीची माहिती संकलित करणे,वाहतूक आणि ॲम्बुलन्स व्यवस्थापन टिमच्या माध्यमातून पथकांचे उपलब्धतेचे अंतररुग्णवाहिका चालकांचे प्रशिक्षण आणि रूग्णाला घरातून दूर ठेवून रूग्णालयातील विलगीकरण सुविधांपर्यंत वाहने पाठविण्याबाबतचे आकडेवारीचे संकलन करणे  आणि सर्व जिल्ह्यांमध्ये 24 तास वाहनांची सतत उपलब्धता असावी याची खात्री करुन घेणे.
इंटर डिपार्टमेंटल अॅंड को-ऑर्डिनेशन टिम अंतर्गत दररोज समन्वय बैठक घेण्यात येणार आहे.आंतर-क्षेत्रीय कार्यसंघाने आवश्यकतेचे मूल्यांकन केले जाईल आणि कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण केल्या जाईलसंबंधित क्रियाकलापांसाठी निधी स्रोत आणि यंत्रणेची ओळख पटविणेसरकारी विभागसंस्थानागरी संस्था आणि इतर संबंधित संस्था यांच्यात आंतर-क्षेत्रीय समन्वय सुनिश्चित केला जाईल. सार्वजनिक आरोग्य योजना आणि आरोग्य क्षेत्राच्या प्रतिसादाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मुख्य व्यवसायात सातत्य ठेवण्यासाठी सर्व क्षेत्र तयार असतील.
00000

No comments:

Post a Comment