Search This Blog

Monday 30 March 2020

विशेष लेख आपला देश लॉकडाऊन का गरजेचे आहे ?

      सर्व जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव गर्दीच्या ठिकाणी जास्त प्रमाणात पसरतो. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये व सर्वांनी आहे त्याच ठिकाणी राहणे महत्त्वाचे आहे.भारतामध्ये सुद्धा कोरोनाचा दिवसेंदिवस प्रसार होताना दिसत आहे.याच पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे.परंतुसर्वसामान्यांना एक महत्त्वाचा प्रश्न पडत आहे.तो म्हणजे लॉकडाऊन म्हणजे कायलॉकडाऊन कशासाठीयाची गरज काय आहेचला या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या उदाहरणावरून समजून घेऊया !
लॉकडाऊन म्हणजे काय:
सार्वजनिक वावर बंद करून जो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहणे म्हणजेच लॉकडाऊन. परंतुयामध्ये जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात येते.
लॉकडाऊन कशासाठी :
आजच्या परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रमुख उद्देश म्हणजे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नयेहाच आहे. तरीसुद्धा लॉकडाऊनची गरज का आहे हे आपण एका उदाहरणावरून समजून घेऊ या..
हे उदाहरण आहे अ आणि ब व्यक्तीचे.अ व्यक्ती कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरच परदेशातून आपल्या घरी परत येतो. विमानतळावर सर्व परदेशी प्रवाशांना होम क्वॉरंन्टाईन करण्यासाठी त्यांची सविस्तर माहिती घेऊन होम क्वॉरंन्टाईनचा शिक्का मारण्यात येतो.आणि पुढील 14 दिवस घरातच राहण्याच्या सूचना देण्यात येतात. या प्रक्रियेतून अ व्यक्ती जातो आणि घरी जाऊन 14 दिवस स्वतःला वेगळ्या खोलीमध्ये राहण्याचा निर्धार करतो. परंतुअ व्यक्तीची आई - बाबापत्नीमुले त्याच्यावर रागावून विचारणा करतेखूप दिवसांनी परदेशातून आला आहेस... पण असा वेगळ्या खोलीमध्ये कशाला राहतोसआमच्या सर्वांसमवेत का बर राहत नाहीजेवण सुद्धा आमच्या सोबत करत नाहीतुला काही होणार नाही तू बाहेर ये आणि आमच्या सोबतच राहा. यावर अ व्यक्तीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगतो कीमी कोरोना बाधित देशातून आलो आहे. मला 14 दिवस होम क्वॉरंन्टाईन करण्यात आले आहे. त्यामुळे मी इतर कोणत्याच व्यक्तीसोबत संपर्कात येणार नाही. याची परिपूर्ण दक्षता घेईल.
5 ते 6 दिवसातच अ व्यक्तीला सर्दीखोकलाताप असे लक्षणे दिसून येतात. यामुळे तो आरोग्य विभागाला याविषयीची माहिती देतो. त्यानंतर आरोग्य विभागाचे पथक येऊन त्या व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठवतात. तपासणीअंती असे निदर्शनास येते कीअ व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह आहे. नंतर घरातील सर्व व्यक्तींची कोरोना तपासणी केल्या जाते. यामध्ये या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह येतात.नंतर अ व्यक्तीवर उपचार करून तो बरा होतो.
आता येवूया ब व्यक्तीकडे,ब व्यक्ती हा व्यापारी / दुकानदार किंवा कायद्यापेक्षा आपल्या कामाला अधिक महत्त्व देणारा आपल्या समजातील सामान्य माणूस समजूया....
ब व्यक्ती देखील काही कामानिमित्त परदेशात जावून परत आला. विमानतळावर ब व्यक्तीची सुद्धा सर्व प्रक्रियानिशी होम क्वॉरंन्टाईन करण्यात आले. 14 दिवस
  घरातच  राहून योग्य ती काळजी घेण्याची सूचना केली गेली.परंतुफारच क्वचित आजारी पडणाऱ्या आपल्याला कोणताच आजार होऊ शकत नाहीअशा अमर विचाराचा असतो. या व्यक्तीने या सर्व सूचना पायदळी तुडवल्या. दुर्लक्ष केले. या व्यक्तीने घरी जाऊन कुटुंबाला आपल्याला देण्यात आलेला सूचना विषयी सांगितलेच नाही. वेगळ्या खोलीमध्ये न राहता सर्व घरातील सदस्यांसोबत वावर केला. आणि आपला दैनंदिन व्यवसाय सुरू केला.यामध्ये त्याच्या संपर्कात त्याच्या व्यवसायात काम करणारे कामगार व ग्राहक आले. ते दिवसानंतर ब व्यक्तीला सर्दीखोकलाताप यायला सुरुवात होते आणि तो उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जातो. नंतर त्याची कोरोना तपासणी केल्या जाते.यामध्ये ब व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून येतो.तेव्हा आरोग्य विभागाचे पथक त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेतात. तसेच त्याच्या घरातील सर्व सदस्यांची सुद्धा कोरोना तपासणी करतात. यावेळी सर्व सदस्य पॉझिटिव्ह आढळून येतात. तेव्हा खूप उशीर झालेला असतो... या काळात त्याचे कुटुंब ,ग्राहकत्याच्या घरात काम करणारी मंडळीलिफ्टमॅन पासून तर पार्टी करणारे मित्रभेटायला आलेले पाहुणे आणि कितीतरी लोक अजाणता कोरोना पॉझिटिव्ह होऊन जातात. कोरोनाचा प्रादुर्भाव या निष्काळजीपणाने वागणाऱ्या ब व्यक्तीपासून सर्व परिसरात सर्वत्र पसरतो. हे सर्व झाल्यानंतर सर्व परीसर लॉकडाऊन केल्या जातो.
अनेकांना त्यांच्या आरोग्य बिघडल्या नंतरच आपण पॉझिटिव्ह असल्याचे कळायला लागते.
या अ आणि ब व्यक्तींच्या प्रसंगांमध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून येतातएक म्हणजे अ व्यक्तीने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले.दुसरी गोष्ट म्हणजे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व शहर लॉकडाऊन केले नव्हते. आता ब व्यक्तींकडून किती लोकांना लागन झाली आहे हे तपासण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाउन करणे गरजेचे आहे. किंवा ब व्यक्ती देशात आली असती व देश लॉकडाऊन असता तर ब व्यक्ती घरातच राहिली असती... आणि त्याने त्यांचा व्यवसाय सुरु केला नसता..आणि कोरोना विषाणूचा प्रसार त्याच्या आणि त्याच्या कुटुंबा पर्यंतच मर्यादित राहिला असता.
सध्या आम्ही भारतीय याच परिस्थितीत आहोत. आम्ही या ब व्यक्तीपासून लागण झालेल्या लोकांच्या शोध घेत आहोत.आम्हाला हे माहिती नाही की कोणाला कोरोनाची लागण झाली आहे. ज्यांना झाली आहेत. त्यांना देखील ही बाब माहिती नाही... आणि लॉकडाऊन केले नाही तर जेव्हा हजारो आजारी पडतील त्याच वेळेस ही बाब माहिती होईल. त्यामुळे कोणत्या घरात आजारी कोण पडले आहेयाची माहिती सध्या आरोग्य विभाग घेत आहे. माहिती लपवू नका. ती जीवघेणी ठरू शकते. तुमच्या प्रियजणांच्यासाठी आणि समाजासाठी ही बाब घातक ठरू शकते.
सर्वजण घरी बसल्याशिवाय आपल्यातले कोरोनाबाधित नेमके लोक किती हे कळणार नाही. तसेच हा संसर्ग मर्यादित ठेवणे शक्य होईल. त्याचसाठी इटली ,अमेरिकास्पेन आदी प्रगत देशांनी जी चूक केली ती चूक भारतीयांनी करू नयेअसे आवाहन देशभर केल्या जात आहे. तरीही काही रस्त्यावर येण्यासाठी धडपडत आहेत. पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. परिस्थिती गंभीर असून शिस्तीने घरी रहाणे ,हात उत्तम उपाय आहे.
केंद्र व राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून 14 एप्रिल पर्यंत सर्व देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊन मुळे सार्वजनिक बंद असून नागरिकांनी घराबाहेर न येता घरातच म्हणजेच आहे त्याच ठिकाणी राहिल्यामुळे कोरोना विषाणूला  प्रतिबंध करता येणार आहे. तेव्हा लॉकडाऊन म्हणजे जे आहे त्या स्थितीत घरातच राहणे होय. एक जबाबदार भारतीय म्हणून हा लॉकडाऊन देशासाठी पाळणे आवश्यक आहे.
प्रवीण टाके
जिल्हा माहिती अधिकारीचंद्रपूर
00000

No comments:

Post a Comment