चंद्रपूर दि. 28 मार्च : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळास्तरावर शिल्लक असणाऱ्या पोषण आहाराचा पुरवठा थांबून होता. तो पूर्ववत करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे. तसेच या काळात दूध हे अत्यावश्यक गरजेमध्ये मोडत असून सर्वांना मुबलक प्रमाणात ते मिळावे, यासाठी सर्व डेअरी पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, असे आदेशही देण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.संचारबंदी च्या कालावधीत दुधाचा सुरळीत पुरवठा सुरू राहण्याच्या दृष्टीने दूध डेअरी पूर्ववत सुरू करण्यात यावे. दूध डेअरी मध्ये काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नियमितपणे कर्तव्यावर येण्या जाण्याकरिता ओळखपत्र देण्यात यावे.
तसेच, दूध डेअरी मध्ये काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता मास्क पुरविण्यात यावे तसेच एकाच ठिकाणी एकापेक्षा अधिक कर्मचारी एकत्रित राहून काम करणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.
शालेय पोषण आहाराचा शिल्लक असलेला तांदूळ व डाळी कडधान्याचे विद्यार्थ्यांना वितरण होणार :
संचारबंदी मध्ये सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळास्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व दाळी, कडधान्याचे विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वितरण करण्याकरिता शालेय शिक्षण विभागाद्वारे निर्देश दिलेले आहे.
वितरण करताना शाळेचे मुख्याध्यापक, योजनेचे काम पाहणारे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तांदूळ व डाळी, कडधान्यांचा शिल्लक साठा विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटपाचे नियोजन करावे, शाळा स्तरावरून वितरणासंबंधी प्रसिद्धी करण्यात यावी, वितरण करताना शाळा स्तरावर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थी, त्यांचे पालक यांना टप्प्याटप्प्याने शाळेमध्ये बोलवुन एकमेकापासून रांगेत 1 मीटरच्या अंतरावर उभे करून वितरण करावे. विद्यार्थी पालक आजारी असल्यास अशा विद्यार्थ्यांचे वितरण घरपोच करण्याचे नियोजन करावे.
वितरणाची नोंद शाळा स्तरावर घेण्यात यावी व वितरणा संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आलेली आहे. अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकात शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे यांनी दिली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी यांची डिस्ट्रिक्ट इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती:
आयुक्त,चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपुर यांनी त्यांचे प्रत्येक झोन करिता एक अधिकारी यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करून त्यांना कार्यकारी दंडाधिकारी अधिकार प्रदान करण्याचे प्रस्ताव त्वरित सादर करावा. या नियंत्रण अधिकारी यांचे अधिनस्त त्यांना मदत करण्यास वार्ड निहाय एक पथक तयार करून त्याची माहिती सुद्धा उपलब्ध करून द्यावी.
जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील मुख्याधिकारी,नगरपंचायत,नगरपरिषद हे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील व त्यांनी त्यांच्या अधिनस्त प्रत्येक वार्डात पथक स्थापन करतील.मुख्याधिकारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी चे अधिकार प्रदान करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील.
सर्व तहसीलदार यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक महसूल मंडळ निहाय महसूल मंडळ अधिकारी यांचे नेतृत्वात एक पथक तयार करून व दोन महसूल मंडळ निहाय एक नायब तहसीलदार यांची कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करतील.
हे सर्व पथक डिस्ट्रिक्ट इन्सिडेंट कमांडर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे नियंत्रणात काम करतील व कायदा व सुव्यवस्था बाबत नियंत्रण व समन्वय,क्षेत्रीय स्तरावरील अडचणी सोडविणे, क्षेत्रीय स्तरावर जिल्हा प्रशासनाचे आदेश पोहोचविणे व आदेश देणे,वाहतुकीमधील अडचणी असल्यास क्षेत्रीय स्तरावर संबंधितांना आदेश देणे यासाठी काम करतील,असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिलेला आहे.
00000
No comments:
Post a Comment