चंद्रपूर, दि 28. मार्च: राज्यावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे अनेक निराश्रित, गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळावे यासाठी राज्यशासन व प्रशासन काम करीत आहे. तसेच, आरोग्य व्यवस्था व इतर वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहायता देणे हे मुख्यमंत्री सहायता निधीचे उद्दिष्ट आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधिमध्ये मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई, येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे पोस्टल ऑर्डर/ मनी ऑर्डर द्वारे माध्यमातून , धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट स्वरुपात, https://cmrf.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन भरणा करता येतो,चेक किंवा डिमांड ड्राफ्ट संबंधित बँक / शाखेतून आरटिजीएस किंवा एनईएफटीद्वारे प्रदान केल्या जाणा-या चलनमध्ये दाता तपशील उल्लेख करून मुख्यमंत्री सहाय्यता निधी एसबीआय संकलन शाखा ,जमा मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे करावी. चेक किंवा डिमांड ड्राफ्ट संबंधित बँक / शाखेतून आरटिजीएस किंवा एनईएफटीद्वारे प्रदान केल्या जाणा-या चलन मध्ये दाता तपशील उल्लेख करून मुख्यमंत्री रिलीफ फंड एसबीआय संकलन शाखा जमा मुख्यमंत्री रिलीफ फंडच्या नावे करावी.
संकलन बँकेच्या स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई या शाखेवर 10972433751 / SBIN0000300 या खाते क्रमांक व आयएफएससी कोडचा वापर करून मुख्यमंत्री सहायता निधी साठी मदत करू शकता.
जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स, चंद्रपूर या संघटनेमार्फत रुपये 1 लाखाचा धनादेश तसेच नाते आपुलकीचे संस्थेतर्फे संस्थेचे सदस्य प्रमोद उरकुडे, जयंत देठे, जितेंद्र मशाळकर, हितेश गोहोकार यांच्या उपस्थितीत 31 हजारांचा धनादेश कोरोना आजारावरील नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना देऊन मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली.
कोरोना आजाराच्या नियंत्रणासाठी मदत करायची असल्यास त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला ऑनलाइन मदत करावी. किंवा मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये द्यायचा असल्यास फक्त दोनच व्यक्ती येऊन हा धनादेश द्यावा जेणेकरून, गर्दी टाळल्या जाईल व आपल्याला मदतही करता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
00000
No comments:
Post a Comment