Search This Blog

Monday 30 March 2020

प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

चंद्रपूरदि. 29 मार्च : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 तसेच कलम 144 व संचारबंदी लागू आहे. त्यामुळे प्रशासन वेळोवेळी सूचना व आदेश काढत आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे.
या असणार कारवाईच्या कलम व शिक्षा:
आदेशाची अवज्ञा केली तर भा.द.वि  कलम 188 नुसार दखलपात्र,जामीनपात्र 1 महिना कैद व 100 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा तसेच जर आदेशाची अवज्ञा झाल्यामुळे मानवी जीवन धोक्यात आले तर 6 महिने कैद व 1 हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
संसर्ग पसरायची हयगयीची कृती आढळून आल्यास भा.द.वि  कलम 269 नुसार दखलपात्र,जामीनपात्र 6 महिने कैददंड किंवा दोन्ही शिक्षा केल्या जाईलघातक कृती (रोग पसरवू शकतो) अशी कृती केल्यास भा.द.वि  कलम 270 नुसार दखलपात्र,जामीनपात्र 2 वर्ष कैददंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.
संसर्गजन्य आजार पसरू नये म्हणून दळणवळणाची साधने याबाबत शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे असे आढळून आल्यास भा.द.वि  कलम 271 नुसार अदखलपात्र,जामीनपात्र 6 महिने कैददंड किंवा दोन्हीही शिक्षा केल्या जाईलसार्वजनिक उपद्रव केल्यास भा.द.वि  कलम 290 ‌ नुसार दखलपात्र,जामीनपात्र 200 रुपये पर्यंत दंडाची शिक्षा केल्या जाईल तसेच अफवा पसरविली तर भा.द.वि  कलम 505(2) नुसार दखलपात्र,अजामीनपात्र 3 वर्ष कैददंड किंवा दोन्हीही शिक्षा केल्या जाईल.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वयेदिलेले आदेश न पाळणे उदा. दुकान पानटपरीहॉटेलआस्थापना उघडे ठेवल्यास कलम 51 ब नुसार दखलपात्र,जामीनपात्र 1 वर्ष कैद,दंड किंवा दोन्हीही शिक्षा होवु शकतात तसेच जर वरील उल्लंघनामुळे मानवी जिवित हानी झाल्यास 2 वर्ष कैद,दंड किंवा दोन्हीही केल्या जाईल,चुकीची अफवा पसरविल्यास कलम 52 नुसार दखलपात्र,जामीनपात्र 2 वर्ष कैद,दंड या शिक्षा केल्या जाईल,जनतेमध्ये भिती निर्माण होईल अशी अफवा पसरविल्याबद्दल दखलपात्र,जामीनपात्र कलम 54 नुसार 1 वर्ष कैद,दंड या शिक्षा होवु शकतात.
महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये जमावबंदी आदेश उल्लंघन केल्यास कलम 37(3) व कलम 135 नुसार दखलपात्र,जामीनपात्र 4 महीने कैद आणि दंड,1 महिना कैद आणि दंड या शिक्षा केल्या जातील.
साथीचे रोग प्रतिबंधक कायदा अन्वये जे जे अत्यावश्यक व योग्य आहे ते करण्याचे आदेश न पाळणे यासाठी कलम 2,3,4 नुसार कलम 188 प्रमाणे शिक्षा केल्या जाईल.
अनावश्यकपणे बाहेर फिरणारे व वाहनांवर अनावश्यकपणे कोणतीही गरज नसतांना फिरुन आदेशाचे उल्लंघन करणारे व त्यांचे वाहन देखील पोलिस ठराविक कार्यमर्यादेसाठी ताब्यात घेऊ शकतात.
आपत्ती व्यवस्थापन कायदाकलम 30 प्रमाणे आपत्ती निवारण होने करीता आवश्यक असणारे जे उपाय करणे शक्य आहे ते करणेकरिता जिल्हास्तरावरील समितीचे अधिकार आहे. कलम 33 अन्वये इतर अधिकारी किंवा आस्थापणा यांना आदेश देण्याचे अधिकार जिल्हा स्तरावरील समितीस आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 संबंधाने सक्षम प्राधिकरणाने मनाई आदेश केलेले असणे आवश्यक आहे.
00000

No comments:

Post a Comment