Search This Blog

Wednesday 15 April 2020

आ. सुभाष धोटे यांच्याकडून जिल्हा सहाय्यता निधीस मदत


प्रशासनाकडून मदतीचे आवाहन ;आतापर्यंत 57 लक्ष जमा
चंद्रपूर, दि.15 एप्रिल : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य एकजूटीने मुकाबला करत आहे. यासाठी आवश्यक अशा निधीसाठी दानशूर व्यक्तीसंस्था आदी घटकांनी जिल्हा सहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे. या अनुषंगाने आता जिल्हा सहाय्यता निधीत योगदान देण्याचा ओघ सुरु झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत जिल्हा सहाय्यता निधीत सुमारे 56 लाख 98 हजार 69 रु. तर  मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रु.52 लाख 36 हजार 834 रु.जमा झाले आहेत.
आज  कृषी उत्पन्न बाजार समितीकोरपणाच्या वतीने आ.सुभाष धोटे यांच्याकडून रु. 1 लक्षचांदा सैनिक प्रसारक मंडळचंद्रपूर तर्फे रुपये 1 लक्ष 1 हजार,  वेपा इलेक्ट्रो होमिओपॅथी प्रॅक्टिशनर असो. चंद्रपूर च्या वतीने रु.75 हजार जनता करियर लॉन्चर तर्फे रु.51 हजारचांदा पब्लिक स्कूल चंद्रपूर च्या वतीने रु.51 हजारडॉ. गजानन वासलवार यांच्यावतीने रु.51 हजारतर चांदा सेवा सह. संस्थाचंद्रपूर च्यावतीने रु.11 हजारभारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारण मंडळ,चंद्रपूर तर्फे रु. 11 हजारजनता नागरी सह. संस्था चंद्रपूर तर्फे रु.11 हजार 111विदर्भ कोकण ग्रामीण बँक धाबा ब्रांचच्या वतीने रु.5 हजार 200दाताळा सेवा सह. संस्था चंद्रपूर  च्या वतीने  रु.5 हजाररयत नागरी सह. पतसंस्था चंद्रपूर च्या वतीने रु.5 हजार,  सिदूंर सेवा सह.संस्थापांढरकवडा सेवा सह.संस्थावढा सेवा सह. संस्थासोनेगाव सेवा सह. संस्थासेवा सह. संस्था बेलसनीउसगाव सेवा सह.संस्थाउसगाव यांच्यावतीने प्रत्येकी 3 हजाराचा धनादेश जिल्हा सहाय्यता निधीस देण्यात आला.
            त्यासोबतच,मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविंड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये  मल्टी ऑरगॅनिक प्रा. लि. चंद्रपूर च्या वतीने रु.3 लक्ष 90 हजार 170बिल्ट ग्राफिक पेपर लिमि.बल्लारपूरच्या वतीने रु.22 लाख 99 हजार 827,अभिदिप केमिकल प्रा. लिमि. तर्फे रु.17 हजार 52 रुपयेसमर्थ इंजीनियरिंग,एस. एस.इरेक्टर्सचंद्रपूरश्री.नारायण किसन अडबालेओम इंडस्ट्रियल सेक्युरिटी सर्विस,चंद्रपूर यांच्या कडून प्रत्येकी रु.5 हजार तर श्री. नंदकिशोर बसांरी यांच्या वतीने रु.2 हजारमुकेश आप्पा यांच्यातर्फे रु. 2 हजार 100 ,श्री.गणपती बुरीवार ,श्री. प्रदीप जुमडेश्री. दत्तात्रेय बलकी व डॉ. प्रियदर्शन मुठाळ यांच्या तर्फे प्रत्येकी रु.25 हजार च्या धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यात आला.
        कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजककंपन्यांचे प्रमुखस्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी  सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment