Search This Blog

Saturday 18 April 2020

चंद्रपूर जिल्ह्यात 27 हजार 181 नागरिकांचे होम कॉरेन्टाइन पूर्ण



सीमावर्ती शेकडो गावे स्वसंरक्षणार्थ झाली सक्रिय
चंद्रपूर,दि. 18 एप्रिल : कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अद्याप आढळलेला नाही. मात्र तरीही या आजारापासून अलिप्त राहण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला अतिशय उत्तम प्रतिसाद चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्ती गावातून मिळत आहे. तेलंगाना राज्याला लागून असलेल्या सीमांवर ही दक्षता अधिक बघायला मिळत आहेत. तर नागपूरयवतमाळवरून येणाऱ्या नागरिकांबद्दल कसून चौकशी केली जात आहे.जिल्ह्यात 27 हजार 181 नागरीकांचे होम कॉरेन्टाईन पुर्ण झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडयापासून जिल्ह्यातील नागरिक अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून लॉकडाऊन पाळत आहे. अशावेळी शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास गावागावातील नागरिक प्रशासनाचे कान डोळे झाले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे अशा पद्धतीच्या तक्रारी वाढल्या असून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी घरात स्वतःला कॉरेन्टाईन करून घ्यावेआरोग्य विभागाला यासंदर्भात माहिती द्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये सध्या 595 ग्रामसेवक, 2 हजार 563 अंगणवाडी सेविका, 2 हजार 392 अंगणवाडी मदतनीस 1 हजार 907 आशा वर्कर 1 हजार 300 ग्राम कर्मचारी कार्यरत आहे.यांच्या सोबतीला गावागावातील तरुणांनी मंडळ बनवून गावामध्ये बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवणे सुरू केले आहे. काही ठिकाणी याला वादाचे जरी स्वरूप आले असले तरी बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने तपासणी करणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात होम कॉरन्टाईनचे प्रमाण वाढणेआरोग्य तपासणी होणेप्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वोच्च ठरविण्यात आले आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी लपून जरी जिल्ह्यात प्रवेश केला तरी त्याची माहिती प्रशासनाकडे पोहोचत असून तपासणी अनिवार्य आहे.
        परराज्यातूनपरजिल्हयातून येणाऱ्या व्यक्तीने याबाबतची सूचना जिल्हा प्रशासनालापोलिस प्रशासनालाआरोग्य विभागाला देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे गावागावात दाखल होणाऱ्या प्रत्येकावर सगळ्यात यंत्रणेचे लक्ष लागले आहे.
दरम्यान,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 82 नागरिकांची नोंद करण्यात आली.  74 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 68 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. 06 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातूनराज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 29 हजार 13 आहे. यापैकी हजार 832 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 27 हजार 181 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 72 आहे.
संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणा-यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांकडून 10 लाखांवर दंड वसूल करण्यात आला असून एकूण 179 प्रकरणात ही कारवाई केली आहे. तर जिल्ह्यात 687 वाहने जप्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005फौजदारी प्रक्रिया संहिता 1860अन्वये विविध अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.  तरीदेखील या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 179 प्रकरणात एकूण 10 लाख 67 हजार 570 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  47 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 687 वाहने जप्त केली आहेत.प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सुचनांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-25327507172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचारसमुपदेशनपाठपुरावाअॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्णप्रवाशांची चौकशीशहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment