Search This Blog

Monday 20 April 2020

जिल्ह्यातील सूट दिलेल्या संस्थांना ई-पास अनिवार्य ; क्यूआर कोड देणार


चंद्रपूर,दि.20 एप्रिल: राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात दिनांक 20 एप्रिल 2020 रोजीपासून सूट दिलेल्या प्रवर्गात येणारे औद्योगिक आस्थापनाऔद्योगिक वसाहतीबांधकाम आस्थापना (शासकीय व खासगी) यांचे संबंधातील अधिकारी,कर्मचारी यांना ई-पास अनिवार्य असून क्यूआर कोड असणारी ई-पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिलेल्या आदेशान्वये उपविभाग अंतर्गत असलेले औद्योगिक आस्थापनाऔद्योगिक वसाहतीबांधकाम आस्थापना (शासकीय व खासगी) यांचे संबंधातील अधिकारी,कर्मचारी यांनी पासेस सुविधेची मागणी केल्यास त्यांना ई-पास परवानगी देण्यात यावी.
असा करावा अर्ज:
औद्योगिक आस्थापनाऔद्योगिक वसाहतीबांधकाम आस्थापना (शासकीय व खासगी) यांचे संबंधातील अधिकारी,कर्मचारी यांनी गुगल प्ले स्टोअर वरून ई-पास चंद्रपूर या नावाचे ॲप डाऊनलोड करून ई-पाससाठी अर्ज करावेत.
अशी असणार प्रक्रिया:
संबंधित उपविभागीय अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्र अंतर्गत औद्योगिक आस्थापनाऔद्योगिक वसाहतीबांधकाम आस्थापना (शासकीय व खाजगी) यांचे संबंधातील अधिकारी,कर्मचारी यांना ई-पासेस निर्गमित करण्याकरिता स्वतंत्र लॉगिन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी सदर लॉगिनमध्ये येणाऱ्या अर्जानुसार रीतसर परवानगी द्यावी. संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी ई-पास परवानगी देतांना संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेशी चर्चा करावी.
या मिळणार ई-पासच्या सुविधा:
उपविभागीय अधिकारी यांनी परवानगी दिल्यानंतर क्यूआर कोड जनरेटर होईल व संबंधित पोलिस अधिकारीकर्मचाऱ्यांना गस्तीचे वेळी क्यूआर कोड स्कॅन करून क्यूआर कोडची खात्री करून तपासणी करता येईल.ई-पासची  परवानगी पीडीएफमध्ये सुद्धा डाउनलोड होत असल्याने त्यांची प्रिंट करून पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे दाखविता येईल.
00000

No comments:

Post a Comment