सढळहस्ते मदतीचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन
चंद्रपूर, दि.3 एप्रिल: राज्यावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे पूर्ण देशामध्ये लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे अनेक निराश्रित, गरजू, लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळावे. यासाठी राज्यशासन व प्रशासन काम करीत आहे. तसेच आरोग्य व्यवस्था व इतर वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी मदत केली आहे.
चंद्रपूरचे माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी रुपये 2 लक्ष चा धनादेश, दि एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी चंद्रपुर यांच्याकडून रुपये 1 लक्षचा धनादेश, व्यंकटेश्वरा स्वामी टेम्पल ट्रस्ट चंद्रपूर व बल्लारपूर यांच्या तर्फे रुपये 1 लक्षचा धनादेश, बल्लारपूर पेपर मिल मजदूर ट्रस्टकडुन 2 लक्षचा धनादेश असे एकूण 6 लक्ष रुपयाचा धनादेश राहुलबाबू पुगलिया यांनी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांना देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली.
या खात्यामध्ये जमा करता येणार मदत:
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19,बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया,मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023,शाखा कोड 00300 आयएफएससी कोड SBIN0000300 या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी मदत करता येणार आहे. सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
कोरोना आजाराच्या नियंत्रणासाठी मदत करायची असल्यास त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला वरील दिलेल्या खात्यामध्ये मदत करावी. किंवा मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये द्यायचा असल्यास फक्त दोनच व्यक्ती येऊन हा धनादेश द्यावा. जेणेकरून गर्दी टाळल्या जाईल व आपल्याला मदतही करता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
देण्यात येणाऱ्या देणगीचा उपयोग राज्यशासन कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी करत असलेल्या विविध उपाय योजनांवर खर्च करणार आहे. राज्य शासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाय योजनांद्वारे या परिस्थितीत मदत शक्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, व्यापारी संस्था व व्यक्तिगत रित्या ज्यांना कोणाला मदतीसाठी पुढे यायचे असेल त्यांनी मदत करावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0000

No comments:
Post a Comment