Search This Blog

Thursday 23 April 2020

शेतीच्या मशागतीची व अन्य पूरक कामे करण्याची परवानगी : ना. वडेट्टीवार


माणुसकीच्या नात्यातून परस्परांना मदत करण्याचे आवाहन
Ø  शेतकऱ्यांना आवश्यक कामे करण्यासाठी परवानगी
Ø  कामगारांना सुविधा देणाऱ्या सिमेंट कारखाने सुरू
Ø  शिजवलेले अन्न पुरवताना ऊन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन
Ø  अन्नधान्याच्या किट शासकीय निधीतून वाटप केल्या नाही
Ø  तेलंगाना व अन्य राज्यातील मजुरांना मदत करणार
Ø  पुढच्या 10 ते 12 दिवसात कोरोना लॅब सुरू होणार
Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  3 मे पर्यंत घरातच राहण्याचे नागरिकांना आवाहन
चंद्रपूर, दि. 23 एप्रिल : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था खिळखीळी झाली आहे. या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शेतीपूरक सर्व उद्योग व्यवसाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू सुरु करणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक अंतर राखून आवश्यक कामांना सुरुवात करावीअसे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत पुनर्वसनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
चंद्रपूर येथे कोरोना उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांचेकडून आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील जनतेशी व्हिडिओ संवाद साधतांना त्यांनी हे आवाहन केले. शेतकऱ्यांनी खरिपाच्या कामाची सुरुवात करण्याची ही वेळ असून एकीकडे कोरोना आजाराशी लढतांना दुसरीकडे शेतीच्या मशागतीकडे लक्ष देणे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लागणारे बियाणेखतेऔषधी याचा तुटवडा पडणार नाही. सहज उपलब्ध होईलयाकडे लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले.
कापूसतूरधानखरेदी-विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकरी, शेतमजूर यांना शेतातील काम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय शेती संदर्भातील काही कामे रोजगार हमी योजना अंतर्गत करता येतील का याची चाचपणी देखील केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तेलंगानामध्ये 10 हजार मजूर सध्या विविध जिल्ह्यांमध्ये अडकून आहेत. तेथील प्रशासनाची आमचा कायम संपर्क असून त्यांची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी प्रयत्नरत आहोत. आई - बाबा तेलंगाना मध्ये अडकून पडल्यामुळे मुलांची व कुटुंबाची आबाळ होत आहे. राजस्थानमधील कोटा येथे काही मुले अडकून पडली आहे. मात्र लोकांच्या संदर्भातील सर्व निर्णय आता केंद्र शासनाच्या हाती असून यासंदर्भातील पुढील निर्देश झाल्यास या लोकांना आपापल्या गावाला पोहोचण्यासाठी मदत केली जाईलअसेही त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 40 हजार अन्नधान्याच्या किट वाटप करण्याबाबतचे नियोजन आपण केले होते. मात्र 12 ते 13 हजार अन्नधान्याच्या कीटचे आतापर्यंत वाटप करता आले. यामध्ये स्वयंसेवी संस्थांनी काही वाटा उचलला होता व काही वाटा आपण स्वतः उचलला होता. या वाटपामध्ये जिल्ह्यातील सामाजिक दायित्व निधीचा कोणताही वापर करण्यात आलेला नाहीअसा खुलासाही त्यांनी केला.
अतिशय गरीब व गरजू असणाऱ्या नागरिकांना या किटचा वाटप करण्यात आला दरम्यान सामाजिक दायित्व निधीचा वापर संपूर्णतः शासकीय यंत्रणेमार्फत होईलयांचा त्यांनी पुनरुच्चार केला. कोरोनामुळे सध्या ग्रामीण व गरीब वस्त्यांमध्ये कोणी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी माणुसकीतून अतिशय सामंजस्याने मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे यावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.
        जिल्ह्यात कोटी 18 लक्ष खर्च करून कोरोना आजाराची तपासणी करणारी प्रयोगशाळा उभी राहत आहे. पुढील 10 दिवसात याठिकाणी कामाला सुरुवात होईल अशी आशा आहे. सध्या जिल्हयात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. नागपूरमध्ये सापडलेल्या मूळच्या चंद्रपूरच्या दोन्ही पॉझिटिव रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळाल्याने ते निगेटिव्ह झाले आहेत. सध्या त्यांना निगराणीखाली नागपूर येथे ठेवलेले आहे.त्यामुळे जिल्ह्यात यापूर्वी कोणीही पॉझिटिव नव्हते.या दोघांमुळे आता तर जिल्हा पूर्णतः कोरोना मुक्त आहे. मात्र जिल्हा कोरोनाच्या सावटातून बाहेर पडावा यासाठी सर्वांनी प्रशासनाने दिलेले निर्देश पाळावे. लॉक डाऊनचे काटेकोरपणे पालन करावेअसे आवाहनही त्यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment