Search This Blog

Friday 24 April 2020

कोरोना विषयी माहिती देणार ; आरोग्य सेतू ॲप


जिल्ह्यात 1 लाखांवर नागरीकांनी डाऊनलोड केले...तुम्ही देखील करा
चंद्रपूर,दि.24 एप्रिल: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासन  विविध उपाय योजना राबवित आहे.सर्वात महत्वाची उपायोजना म्हणजे देशभरात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन केले आहे. कोरोनाशी संबंधित माहितीआजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती म्हणजेच कोरोना विषाणूची जोखीम कितपत आहे यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू ॲप लॉन्च केले आहे.जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 845 नागरीकांनी ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करीत आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करावेअसे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. हे अ‍ॅप मराठी आणि हिंदी या भाषांसोबत 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
सध्या कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत असून त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी आणि सर्वांनी याबाबत सजग राहून त्याविरोधात लढा उभारावायासाठी हे अ‍ॅप मार्गदर्शन करेल. सर्व भारतीय भाषांमध्ये सदर अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले असून सर्वांना समजेल अशी माहिती त्यावर आहे. आरोग्य सेतू अ‍ॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचा वापर करतं. जीपीआरद्वारे व्यक्तीचं रिअल टाईम लोकेशन ट्रॅक करण्यात येतं. तसेच कोणताही कोरोनाग्रस्त व्यक्ती जवळ आल्यास हे अ‍ॅप ट्रॅक करणार आहे. 6 फूट अंतरापर्यंत हे अ‍ॅप व्यक्तीला ट्रॅक करू शकतं.
कोरोनाविरोधातील लढाईत लोकांना आरोग्य सेवांशी जोडणं हा अ‍ॅपचा प्रमुख उद्देश आहे. अंगणवाडीआशा कार्यकर्त्यांसह शालेय शिक्षक आणि आरोग्य खात्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या अ‍ॅपबाबत जनजागृती निर्माण केली जात आहे. आयओएस आणि ऍन्ड्रॉईड फोनवर हे अ‍ॅप डाऊनलोड केले जाऊ शकते.
कोरोनाला घाबरू नकाआरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करा आणि कोरोनाशी संबंधित माहिती जाणून घ्या. आपल्या आजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती तसेच प्रत्येक राज्याचे हेल्प डेस्क नंबर आणि इतर महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या फोन मध्ये 'आरोग्य सेतूअ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आरोग्य सेतू अॅप असा करावा डाऊनलोड:
गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आरोग्य सेतू सर्च करून हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे. हे ॲप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) बनवलेला असून त्यामुळे एनआयसीने जारी केलेलं ॲप डाऊनलोड करावे.
आरोग्य सेतू अ‍ॅप कसा वापरावा:
आयओएस आणि ऍन्ड्रॉईड फोनवर हा अॅप डाऊनलोड करावा. त्यानंतर ब्लुटूथ आणि लोकेशन ऑन करावे. त्यात सेट लोकेशन  "ऑलवेज" असे ठेवावे. आपल्याला आवश्‍यक असलेली भाषा त्यावर नमूद केल्यास त्या भाषेमध्ये सर्व माहिती आरोग्यसेतूद्वारे उपलब्ध होते. अ‍ॅपमध्ये असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे स्पष्टपणे दिल्यास आपल्यामध्ये कोविडच्या आजाराची लक्षणे आहे कायाची माहिती देखिल लगेच मिळते. यासह इतर आजारांविषयी देखिल त्यावर माहिती मिळत असल्याने हा अ‍ॅप लोकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरला आहे.        
00000

No comments:

Post a Comment