Search This Blog

Tuesday 21 April 2020

चंद्रपूरच्या गावागावात कोरोना मुक्तीसाठी लढा



शेकडो सरपंचांशीसचिवांशी सिईओंचा व्हीडीओ संवाद
Ø  बाहेरगावावरून येणाऱ्या प्रत्येकाला शाळेत कॉरेन्टाइन
Ø  प्रत्येक गावात मोठ्याप्रमाणात निर्जंतुकीकरण
Ø  बचत गटांमार्फत गावागावांमध्ये मास्क व साबणाचे वाटप
Ø  मेगा फोनवर गावागावांमध्ये सुरू आहे दंवडी
Ø  चेक पोस्टवर आरोग्य तपासणी पथक तैनात
Ø  प्रत्येक गावामध्ये कोरोना दक्षता समिती
Ø  चंद्रपूरमध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही
Ø  शेल्टरहोम मधील मजुरांना कामांची उपलब्धता
Ø  सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा
चंद्रपूर, दि.21 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्ती शेकडो गावांमध्ये कोरोना मुक्तीचा लढा ग्रामपातळीवर भक्कमपणे लढला जात आहे. गावात रेड झोन जिल्ह्यांमधून येण्यास निर्बंध टाकले आहे. मात्र चुकून आलेल्या नागरिकांना गावातील शाळांमध्ये हे निवासी ठेवले जात असून तपासणी केल्यानंतरच गावात प्रवेश दिला जात आहे. शहरांप्रमाणेच गावात देखील ग्राम दक्षता दल सक्रिय झाले असून सुरक्षातपासणीमदतनिर्जंतुकीकरण व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी यासंदर्भात आज जिल्ह्यातील शेकडो सरपंचाची संवाद साधला.
चंद्रपूर जिल्ह्यातील 1836 गावांमध्ये कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. त्यातही सीमावर्ती भागामध्ये तेलंगाना राज्यनागपूर,यवतमाळ आदी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातून कोणीही सिमांमध्ये येऊ नयेचुकून गावात आल्यास त्यांना कॉरेन्टाईन करणेगावांमध्ये येणार यांची यादी तयार करणे, फवारणी करणे, ग्रामपंचायत स्तरावर समिती स्थापन करणे, गावात साबण वाटप करणे, हात धुण्याचे महत्त्व पटवून देणे, गावात पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे, गावांमधील असंघटीत मजुरांची माहिती घेणे, गावातील असंघटीत मजुरांसाठी धान्य उपलब्ध करणे, परराज्यातील व अन्य मजुरांची राहण्याची व्यवस्था करणे, जिल्हा व तालुका कोरोना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणे, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू पुरवठादार यांची यादी प्रसिद्ध करणे, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये 1 मीटरचे अंतर राखणे गावांमध्ये स्वच्छता करणे आदी 17 घटकांची पूर्तता प्रत्येक गावाला करणे आवश्यक आहे. याशिवाय आरोग्यविषयक सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. गावागावात उपलब्ध करून देण्यात आलेल्या मेगाफोन वरून कोरोना संदर्भात रोज नव्या सूचनांची दवंडी चंद्रपूरच्या गावागावांमध्ये दिल्या जात आहे.
याशिवाय जिल्ह्यातील 52 चेक पोस्टवर 24 तास आरोग्य पथक तैनात असून प्रत्येकाची तपासणी याठिकाणी केली जाते पोलिसांकडून कोणालाच प्रवेश दिला जात नाही.परवानगी घेऊन गेलेल्यांची देखील तपासणी करूनच त्याला आत मध्ये सोडल्या जाते. तसेच प्रत्येक चेक पोस्टवर निर्जंतुकीकरण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. बाहेरून मालवाहतूक वा अन्य काही ही वाहतूक करणाऱ्या वाहनांचे देखील निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. आत मध्ये येऊन परत जाणाऱ्या वाहनधारकांच्या चालकांना कोणाशीही संपर्क येणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या जात आहे.
गावातील प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक गावातील बचत गट सक्रिय झाले असून मास्क सोबतच साबणाचे देखील वाटप केले जात आहे.
याशिवाय निर्जंतुकीकरण प्रक्रिया, हात स्वच्छ धुणे ,मास्क कसे वापरायचे याबाबतचे देखील समुपदेशन केले जात आहे. गावागावातील शाळांमध्ये आवश्यकता पडल्यास बाहेरून येणाऱ्या नागरिकांना कॉरेन्टाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी 14 दिवसांपर्यंत गरज पडल्यास कॉरेन्टाईन केले जाते.
आज जिल्ह्यातील सर्व सरपंच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे मुख्य लेखाधिकारी अशोक मातकर यांनी संपर्क साधून सूचना केल्या उद्या पुन्हा काही सरपंचांची संपर्क साधला जाणार आहे. गावागावातील आपले सरकार केंद्रांमधून सरपंचांनी व ग्रामपंचायत सचिवांनी हा संवाद केला.
            जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 21 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 85 नागरिकांची नोंद करण्यात आली.  77 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 76 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. 1 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातूनराज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 30 हजार 725 आहे. यापैकी 2 हजार 524 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 28 हजार 201 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 112 आहे.
            नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 198 प्रकरणात एकूण 11 लाख 73 हजार 270 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 714 वाहने जप्त केली आहेत.प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
            जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी अतिशय महत्वाचे असलेले आरोग्य सेतू ॲप ॲन्डड्राईड मोबाईलवर डाऊनलोड करावे. यात सोपे 4 प्रश्न नागरिकांना विचारले जातील. आपण आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहोत की असुरक्षितहे या ॲपमध्ये कळते. तसेच देशातील कोरोनाची सद्यस्थिती जाणून घेता येते. एकप्रकारे या ॲपद्वारे आपण स्वत:चे डॉक्टर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी हे ॲप त्वरीत डाऊनलोड करावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
            नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-25327507172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचारसमुपदेशनपाठपुरावाअॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्णप्रवाशांची चौकशीशहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment