Search This Blog

Wednesday 8 April 2020

गरजूंना शिवभोजन थाळी ठरतेय वरदान जिल्ह्यात दर दिवशी 3 हजार 188 पॅक फुडचे वाटप


चंद्रपूर, दि. 8 एप्रिल : जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये निराश्रितबेघरनिराधार व विमनस्क अशा गरजू नागरिकांना शिवभोजन थाळी वरदान ठरत आहे. जिल्ह्यामध्ये दर दिवशी जवळपास 3 हजार 188 शिवभोजन थाळी अंतर्गत पॅक फुडचे वाटप सकाळी 11 ते 3 या वेळामध्ये करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये शिवभोजन थाळीची किंमत 10 रुपये वरून आता केवळ 5  रुपये केली आहे. त्यामुळे ही योजना गरजूंसाठी उपयोगी ठरत आहे.
शिवभोजन थाळीचे बंद डब्यामध्ये वाटप:
शिवभोजन थाळीचे स्वरूप लॉकडाऊनच्या काळामध्ये  बदलले असून गरजूंना पॅक फुड अर्थात बंद डब्यामध्ये तयार जेवण दिले जात आहे. त्यामुळे गर्दी न होता नागरिक पॅक फुड घेत आहे.
पॅक फूड वाटप करतांना घेत आहेत विशेष काळजी:
शिवभोजन केंद्राबाहेर 2 व्यक्ती मध्ये 1 मीटरचे सुरक्षित अंतर राखण्यासाठी चौकोन आखलेले आहेत.सोशल डिस्टन्सिंग राखुनच पॅक फुडचे वाटप करण्यात येत आहे.
जिल्ह्यात या ठिकाणी आहेत शिवभोजन केंद्रे:
चंद्रपूर शहरांमध्ये पंजाब नॅशनल बँक जटपुरा गेट येथे आगमन नामदेव सावजी भोजनालय,  बस स्टॅन्ड महसूल भवन जवळील मयूर स्नॅक्स कॉर्नर,बंगाली कॅम्प चौक येथे साईकृपा भोजनालय,शासकीय रुग्णालय येथे सुकून बिर्याणी सेंटर व वैष्णवी रेस्टॉरंट अँड भोजनालय तसेच जुने बाजार समिती भाजी मार्केट येथे विशाखा महिला बचत गट हि शिवभोजन केंद्रे सुरू आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यांमध्ये झाशी राणी चौक तलाठी कार्यालय जवळ शिवभोजन केंद्र ब्रह्मपुरीराजुरा तालुक्यामध्ये तहसील ऑफिस जवळ ज्योती कॅटरर्सवरोरा तालुक्यामध्ये चीरघर प्लॉट जवळ रवी खानावळसावली तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल गाळा क्रमांक 1 येथे लक्की सोशल क्लब, चिमूर तालुक्यामध्ये टिळक वार्ड शिवाजी चौक मार्केट येथे समाधान फाउंडेशन चिमूरबल्लारपूर तालुक्यामध्ये मेन रोड गणपती वार्ड बल्लारपूर येथे शिवशाही थाळी खानावळ याठिकाणी शिव भोजन केंद्रे सुरू आहे.
पॅक फुडचे वाटप करतांना सर्व माहिती शिवभोजन ॲपद्वारे भरण्यात येते. यामध्ये प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र काढले जात आहे. यामुळे गरजू ,गरजवंत व निराश्रित लोकांनाच याचा लाभ मिळत आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र महत्वाचे ठरत आहे.
00000

No comments:

Post a Comment