Search This Blog

Wednesday 8 April 2020

समृद्ध किसान योजनेअंतर्गत घरपोच भाजीपाला विक्री


चंद्रपूरदि. 8 एप्रिल: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भाजी मार्केट मधील गर्दी टाळण्यासाठी चांदा ते बांदा योजना व समृद्ध किसान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना घरपोच भाजीपाला विक्री सुरू केली आहे.
मुल,बल्लारपूरपोंभुर्णा या  तालुक्यांमध्ये टाटा ट्रस्ट व सीनी मार्फत 86 समृद्ध शेतकरी गटाची निर्मिती करण्यात आली असून या गटामार्फत चंद्रपूरच्या विविध तालुक्यांमध्ये थेट शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून प्रायोगिक तत्वावर भाजीपाला विक्री करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासन व जिल्हा कृषी विभागाच्या मंजुरीने गटांमधील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना विक्री करण्यास मदत मिळाली.
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये.यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच व मास्क,सॅनीटायझरचा वापर करून,जिल्हा प्रशासनाने दिलेले नियम पाळूनच सदर शेतकरी गट विक्री करीत आहे.तसेच गटामार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेले माहिती पत्रके सुध्दा ग्राहकांना देण्यात येत आहे.
आज पर्यंत समृद्ध शेतकरी गटांमार्फत 550 क्विंटल भाजीपाल्याची विक्री घरोघरी जाऊन करण्यात आली आहे. ही विक्री  समोरही सुरू राहणार आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना थेट दारावर स्वच्छताजा भाजीपाला पुरविण्यात येत आहे व त्यामुळे बाजारामध्ये गर्दी कमी होण्यास मदत झाली. अशी माहिती टाटा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे प्रणव वाकडे यांनी सांगितली आहे.
या थेट भाजीपाला विक्री मधून नागरिकांनी भाजीपाला विकत घ्यावाअसे आवाहन चांदा ते बांदा योजना व समृद्ध किसान योजने मार्फत करण्यात येत आहे.
थेट भाजीपाला विक्रीसाठी टाटा ट्रस्ट व सीनीचे तांत्रिक मार्गदर्शन तसेच समन्वय म्हणुन प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे रियाज मुलानीप्रणव वाकडेतालुका समन्वयक यश दुधे,चेतन दाहे करत आहे.
00000

No comments:

Post a Comment