Search This Blog

Tuesday 28 April 2020

बेरोजगारांनो,शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा


ऑनलाइन करता येणार नोंदणी
चंद्रपूर,दि.28 एप्रिल: राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करण्याची आवश्यकता असून  www.mahaswayam.gov.in येथे नोंदणी करावीअशी  माहिती सहाय्यक आयुक्तजिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैयाजी येरमे यांनी दिलेली आहे.
नोकरीसाठी सेवायोजना कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा सुविधा ऑनलाईन पध्दतीने वेबसाइटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. राज्यभरातील वेळोवेळी आयोजीत करण्यात  येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणेरोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणेकेंद्र राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे. आपली शैक्षणीक पात्रता वाढ करणेपत्तासंपर्क क्रमांकई मेल यामध्ये दुरूस्ती करणे वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसुचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे इत्यादी बाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे.
उद्योजकाच्या मागणीनुसार उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधारलिंक असणे आवश्यक आहे. अनेक बाबींचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने नोंदणीसह आधारकार्ड जोडणी करणे गरजेचे आहे. असे भैयाजी येरमे यांनी स्पष्ट केले आहे.
00000

No comments:

Post a Comment