चंद्रपूर,दि.13 एप्रिल: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही.परंतु, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.विशेष खबरदारीसाठी जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना चेकपोस्ट वरच निर्जंतुक करण्यात येत आहे. यासाठी खास प्रणाली लावण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा शिरकाव चंद्रपूर जिल्ह्यात येवु नये यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी निर्जंतुकीकरण प्रणालीनुसार वाहने निर्जंतुक करण्यात येत आहे.
शहरांमध्ये पडोली, बंगाली कॅम्प, बागला चौक, एपीएमसी गेट,फळे मार्केट गेट याठिकाणी वाहनांचे निर्जंतुकीकरण करत आहे. पडोली, बंगाली कॅम्प, बागला चौक येथे 24 तास तर एपीएमसी गेट,फळे मार्केट गेट येथे पहाटे 4 ते दुपारी 12 पर्यंत निर्जंतुकीकरण पथकाद्वारे वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेचे निर्जंतुकीकरण करणारे कर्मचारी, मलेरिया विभागाचे कर्मचारी, पोलीस व इकोप्रोचे स्वयंसेवक यांच्या सहकार्याने निर्जंतुकीकरण होत आहे.
000000


No comments:
Post a Comment