Search This Blog

Sunday 5 April 2020

यंदा महावीर जयंतीला नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातूनच प्रार्थना करा - मंत्री विजय वडेट्टीवार


चंद्रपूर, दि. 5 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसनइतर मागास बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भगवान महावीर जयंती निमित्त राज्यातील जैन बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान महावीर यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शांतीअहिंसा आणि बंधुभावाची शिकवण दिली आहे. ती शिकवण आजही संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक आहे. त्या शिकवणीनुसार सर्वानी आचरण ठेवल्यास संपूर्ण मानवजात सुखी होईलअसे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसनइतर मागास बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
भगवान महावीरांनी संपूर्ण समाजाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला होता. महावीर जयंतीनिमिताने  दरवर्षी अनेक जैन बांधव भजन संध्येसारख्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करतात मात्र यंदा सर्व सणांवर कोरोना नामक संकटाचे सावट असल्याने मोठा उत्सव साजरे करणे तरी शक्य होणार नाहीत्यामुळे यंदा महावीर जयंतीला नागरिकांनी घराबाहेर पडू नये. कोरोना या विषाणू प्रादुर्भावाचे गांभीर्य समजून घ्यावे आणि घराबाहेर पडणे टाळावेपूजा अर्चा प्रार्थना घरातूनच करा असे आवाहन पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी जैन बांधवांना  केले आहे.
00000

No comments:

Post a Comment