Search This Blog

Monday 6 April 2020

जीवनावश्यक वस्तूंच्या भावावर नियंत्रण ठेवा : खासदार बाळू धानोरकर


चंद्रपूर,दि. 6 एप्रिल : कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या भावावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. परंतु, वायदा बाजारातील काही दलालांनी कृत्रिम टंचाई करून भाव वाढविण्याचे दिसून येत आहे. दोषींवर कारवाई करून भाव नियंत्रण ठेवण्याचे निर्देश खासदार बाळू उपाख्य सुरेश धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांना दिले.
आज जिल्हाधिकारी यांच्या कक्षात कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधक उपयोजना व अमलबजावनी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आलीयावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार ,मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले तसेच विनोद दत्तात्रयरामू तिवारी यांची उपस्थिती होती. 
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचा निर्णय देशभरात लागू करण्यात आला. या निर्णयामुळे या संसर्गजन्य रोगावर बऱ्याच अंशी नियंत्रण प्रशासनाला शक्य झाले. मात्र, नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवून लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुसह्य व्हावेतळागळातील जनतेपर्यंत खाद्यान्याच्या सोयीआरोग्य सेवाकोरोना प्रतिबंधक उपयोजना या करिता खासदार बाळू उपाख्य सुरेश धानोरकर यांचे पत्राचार व आवाहनानुसार वेलोलीभारत सरकारचे उपक्रमलहान मोठे उद्योग व सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून होत असलेल्या मदत कार्याचा आढावा खासदार बाळू उपाख्य सुरेश धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी अंडरग्राउंड वेकोलि कामगारांबाबत देखील सुरक्षेबाबत वेकोळी सोबत चर्चा करून निर्णय घ्यावा असे निर्देश खासदार बाळू उपाख्य सुरेश धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. त्यासोबतच रेशन कार्डधारकांना 2 व 3 रुपये किलो प्रमाणे धान्यवाटप किलो तांदूळ प्रतिव्यक्ती, चंद्रपूर शहरातील 85000 घरात प्रत्येक वार्डात फायर ब्रिगेड ट्रेकर्स द्वारे सोडियम हायपोकलोरेट फवारणीगीग मशीनआरोग्य विभाग याबाबत आढावा घेतला.
00000

No comments:

Post a Comment