Search This Blog

Wednesday 8 April 2020

कोणतेही लक्षण आढळल्यास आरोग्य विभागाला तात्काळ माहिती द्या : जिल्हाधिकारी




Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  पुढील 7 दिवस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
Ø  उद्रेकाच्या परिस्थितीतील मॉक ड्रिल यशस्वी
Ø  फक्त जीवनावश्यक दुकाने पुढील काळात खुली राहणार
Ø  आठवडाभर घराबाहेर पडावेच लागणार नाही याचे नियोजन करा
Ø  गरज पडल्यास एखादा भाग सील करण्यात येईल
Ø  आरोग्य विषयक माहिती लपून न ठेवण्याचे आवाहन
Ø  भाजी बाजार व अन्य ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन
Ø  214 वाहने ताब्यात, 35 जणांना अटक, 95 जणांवर कारवाई
Ø  हॅलो चांदा व इतर हेल्पलाईनचा वापर करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 8 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र देशासह राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे.कोरोनाचा उद्रेक झाल्यास सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र कोणीही आपला आजार लपवून ठेवू नये. रुग्णाची तपासणी करण्याची संपूर्ण तयारी जिल्ह्यात आहे.त्यामुळे पुढील काळात घराच्या बाहेर निघावे लागणार नाही. असे आठवड्याभराचे नियोजन कराअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्हा एखाद्या अलिप्त किल्ल्याप्रमाणे सध्या पॉझिटिव रुग्णांपासून दूर आहे. त्यामुळे प्रत्येक गावप्रत्येक वार्डप्रत्येक शहर या आजारापासून दूर कसे राहील यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. नव्याने येणाऱ्या प्रत्येक माणसाची माहिती आरोग्य विभागाला द्या. कोणतीही माहिती लपवून ठेवू नका.आरोग्य विभाग व अन्य शासकीय कर्मचारी चौकशीसाठी आले असता त्यांना योग्य तो प्रतिसाद द्या. रुग्णाची पूर्ण काळजी घेण्यासाठी प्रशासन तयार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोणाच्याही हलगर्जीपणामुळे समाजाचे स्वास्थ्य धोक्यात येणार नाहीयाची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत उद्रेक झाल्यास करावयाच्या उपाययोजनांची मॉक ड्रील जिल्हाधिकारी व प्रमुख अधिकार यांच्या उपस्थितीत पार पडले. जिल्हा येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामना देण्यास तयार आहे. कोणतीही उणीव राहू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी जिल्हातील नागरिकांची संवाद साधताना स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी यांनी काल 1 नवीन आदेश काढत केवळ जीवनावश्यक वस्तू विक्री मध्ये भाजीपालाकिराणा सामानदूधब्रेड,अंडीमांसमासोळीबेकरीपशुखाद्याची दुकानेगॅस पुरवठा करणारी यंत्रणा सकाळी 7 ते दुपारी 2 या काळात सुरू राहतील असे स्पष्ट केले आहे. या काळात कोणतेही वेगळे व्यापारी प्रतिष्ठान सुरू करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तथापिइलेक्ट्रिकल व अत्यावश्यक दुरुस्ती संदर्भात कारागिरांनी घरी जाऊन सेवा द्यावीअसे आवाहन करण्यात आले आहे.
गंजवार्ड परिसरातील चंद्रपूर शहरातील भाजीपाला बाजाराला कोहिनूरी मैदानामध्ये सुरू करण्यात आले आहे. याशिवाय काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूची विक्री आहे .त्या ठिकाणी आणि सामाजिक दुरी पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहे. प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानासमोर हात धुण्याचीसॅनीटायझरची व्यवस्था करावीअसेही स्पष्ट करण्यात आले असून नागरिकांनी या सूचनांचे पालन करावेअसे आवाहनही करण्यात आले आहे.
बँकेमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसून आले आहे. आवश्यकता नसताना बँकेच्या व्यवहार टाळण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाने दिला आहे. फारच गरज असेल तर सामाजिक दुरी राखून बँकेचा व्यवहार पार पडावा,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 जिल्ह्यामध्ये विदेशातून आलेल्या एकाही नागरिकांची तपासणी बाकी राहिलेली नाही. 204 नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. एकाही नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह नाही. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अन्य राज्यातून अन्य जिल्ह्यातून आलेल्या 26 हजार 26 नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 10 हजार 994 नागरिक सध्या निगराणीत आहे. याशिवाय 14 दिवस होम कॉरेन्टाईन झालेल्या रुग्णांची संख्या 15 हजार 32 आहे. इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन रुग्णांची संख्या 20 आहे.
       चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून अन्य जिल्ह्यातील 5 हजारावर नागरिकांना शेल्टर होममध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येत आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. याशिवाय निमोनिया सदृश्य कोणत्याही आजाराची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य ती माहिती द्यावीअसे आवाहन त्यांनी केले आहे. यापुढे कोरोना व त्याच्याशी साम्य असणाऱ्या कोणत्याही आजाराच्या संदर्भात लक्षणे आढळून आल्यास संबंधित सर्व नागरिकांची तपासणी केली जाणार आहेत. नागरिकांनी त्याला देखील प्रतिसाद द्यावा,असे आवाहन केले आहे.
नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचारसमुपदेशनपाठपुरावाअॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्णप्रवाशांची चौकशीशहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावाअसे आवाहन करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment