Search This Blog

Thursday, 2 April 2020

ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व विमा


चंद्रपूर,दि. 1 एप्रिल: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाय योजना करीत आहे तसेच ग्रामपंचायत स्तरावर देखील सर्व ग्रामपंचायत कर्मचारीअंगणवाडीमिनी अंगणवाडी कार्यकर्त्याअंगणवाडी मदतनीसआशा कार्यकर्ती यांच्यामार्फत लोकांमध्ये जनजागृतीस्वच्छता मोहीम राबविणेआरोग्याची काळजी घेणे इत्यादी कामे अहोरात्र मेहनत करून जीवाची पर्वा न करता करीत आहे. अशा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व विमा देण्याची सुचना राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद यांना केली आहे,अशी माहिती शासन परिपत्रकात  दिली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या अनुसूची 1ग्रामसूचीमध्ये कलम 45 अन्वये विविध कामांचे विषय दिलेले आहेत. त्यामधील सध्याच्या परिस्थितीत अपंग निराश्रित आणि आजारी असलेल्यांना साहाय्य देणेआरोग्य रक्षण व सुधारणाकोणत्याही संक्रमक रोगाचा उद्रेकफैलाव किंवा पुनरुभ्दवन होण्यास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणेकोणतीही नैसर्गिक आपत्ती आली असता रहिवाशांना सहाय्य देणे इत्यादी विषय हाताळण्यात येतात.
या सर्व बाबी कामाचा भाग असल्या तरी देखील सदर कर्मचारी हे आपल्या जीवाची जोखीम पत्कारून हि कामे करीत असल्याने त्यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधन व्यतिरिक्त रुपये 1 हजार इतकी प्रोत्साहनपर रक्कम अदा करण्यात यावी. अशी सूचना महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद यांना दिलेली आहे.
तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत  आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा दिलेला आहे.त्याच धर्तीवर ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 90 दिवसासाठी रुपये 25 लाखाचा विमा जिल्हा परिषद स्तरावर उतरविण्यात येणार आहे.
या योजनांसाठी येणारा खर्च हा 14 व्या वित्त आयोगाच्या निधीवरील बँक खात्यात जमा व्याज रक्कम14 व्या वित्त आयोगाअंतर्गत मागील 5 वर्षातील शिल्लक असलेला अखर्चित निधीशासन निर्णय क्रमांक जीपीडीपी 2019,प्र.क्र. 38पंरा-6दि.28 मे 2019 मधील मुद्दा क्रमांक 3.6 मध्ये नमूद केल्यानुसार आरोग्यउपजीविका यासाठी वित्त आयोगाच्या निधीतील 25 टक्के तरतूदजिल्हा परिषद सेस फंड या नुसार प्राधान्य क्रमानुसार भागविण्यात येणार आहे.
00000

No comments:

Post a Comment