Search This Blog

Thursday 16 April 2020

जिल्ह्यातील दानशूरांकडून 60 लक्ष जमा


जिल्हा सहाय्यतेला मदत करण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 16 एप्रिल: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळत असूनआजपर्यंत सुमारे 60 लक्ष रुपयांचा निधी जिल्हाधिकारी सहाय्यता निधीसाठी उपलब्ध झाला आहे. जिल्हा सहायता  निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी सामोरे येऊन योगदान दिले आहे.
     आज प्रामुख्याने श्रीमती सुमती वझलवार चंद्रपूर यांच्याकडून रु.25 हजारजयबुद्ध मजूर सह.संस्था विठ्ठलवाडाच्या वतीने रु.1 हजारविविध कार्यकारी सह. संस्था टेमुर्डा श्री.मेरू नागरी सह. पतसंस्थामहात्मा फुले विद्यालय कर्मचारी सह. पतसंस्थामेंडकी तर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्था भद्रावतीच्या वतीने प्रत्येकी रु.11 हजारस्वामी विवेकानंद नागरी सह. पतसंस्था चंद्रपूर तर्फे रु.10 हजारआदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था,करंजी तर्फे रु.2 हजारसेवा सह. संस्था सोईटसेवा सह. संस्था वंधली,विविध कार्यकारी सह. संस्था माढेळीयशस्वी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था चिमूरविविध कार्यकारी सह.संस्था कन्यका नागरी सह पतसंस्था ब्रह्मपुरीव सेवा सहकारी संस्था मालडोंगरीच्या वतीने प्रत्येकी रु.5 हजाराचा धनादेश जिल्हा सहायता निधीस देण्यात आला.
      कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजककंपन्यांचे प्रमुखस्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी  सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment