Search This Blog

Wednesday, 29 April 2020

जिल्ह्यात कोरोना संकटात सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन


आतापर्यंत जिल्ह्यात 68 लाख जमा
चंद्रपूर दि. 29 एप्रिल : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास  उत्तम प्रतिसाद मिळत असून या आवाहनास  प्रतिसाद देत अनेक संस्था, व्यक्ती यांनी जिल्हा सहायता निधीच्या खात्यात देणग्या देणे सुरू केले आहे.
आज प्रामुख्याने डी.आर.लिखार चंद्रपूर यांच्याकडून रु.51 हजार, दि लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट, नगीनबाग, चंद्रपूर यांच्यावतीने रु.11 हजार, इनरव्हील क्लब ऑफ चांदाफोर्ट चंद्रपूर यांच्याकडून रु.15 हजार ,दिपाली चिंतावार यांच्याकडून रु.5 हजार, कर्मवीर कर्मचारी सह.पतसंस्था नागभीडच्या वतीने रु.11 हजार तर सेवा सह. संस्था सास्ती, विश्वशांती विद्यालय कर्मचारी सह. पतसंस्था सावली व शेतकरी सहकारी भातगिरणी संस्था, सावलीच्या वतीने प्रत्येकी रु.5 हजाराचा धनादेश जिल्हा सहायता निधीस देण्यात आला.
मदतीसाठी  बँक खात्यात पैसे जमा करा !
      कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment