Search This Blog

Wednesday 8 April 2020

जीवन विकास कल्याण संस्था या रास्तभाव दुकानावर कारवाई


चंद्रपूरदि. 8 एप्रिल: जिल्ह्यातील मौजा शामनगर,चंद्रपूर येथील रास्त भाव दुकानदार  सविता सपना राय हे कार्ड धारकांना "प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना"अंतर्गत शिधात्रिकाधारकांना निर्धारीत वाटप परीमाना पेक्षा कमी धान्य देत असल्याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जीवन विकास कल्याण संस्था या रास्त भाव दुकानावर कारवाई करण्यात आली आहे.
8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे यांनी दुकानाची तपासणी केली असता. दुकानात उपस्थित कार्ड धारक यांचे शिधापत्रिका तपासणी करून त्यांना प्रत्यक्ष मिळत असलेल्या धान्याबाबत चौकशी करून बयाण घेण्यात आले. बयाणा अंती कार्ड धारक यांना मंजुर धान्या पेक्षा कमी धान्य देत असल्याबाबत दिसुन आले.
कार्डधारक यांना धान्य दिल्याची पावती देत नसल्याचे आढळुण आले. दुकानात माहे एप्रील 2020 करीता प्राप्त धान्य व पॉस मशीनद्वारे वितरीत केलेले धान्य याची तपासणी करून पुस्तकी शिल्लक काढण्यात आली. पुस्तकी शिल्लक नुसार दुकानातील प्रत्यक्ष शिल्लक साठा तपासणी केले असता.गहु एकुण 1.50 क्विंटल व तांदुळ 4.99 क्विंटल अधिक व साखर 3 किलो कमी आढळून आले.
सदर दुकानात पुस्तकी शिल्लक पेक्षा प्रत्यक्ष शिल्लक अधिक असल्याने सदर दुकानातील प्रत्येक शिल्लक साठा सील करण्यात येऊन त्यांचे सुप्रतनाम्यावर पुरवठा विभाग कार्यालयाच्या पुढील आदेशाशिवाय विल्हेवाट न लावण्याबाबत निर्देश देऊन त्यांना सुप्रतनामा देण्यात आला. अशी माहिती निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे यांनी दिली आहे.
00000

No comments:

Post a Comment