Search This Blog

Wednesday 29 April 2020

शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन


चंद्रपूर, दि.29 एप्रिल: नवनवे तंत्र, शिकण्याचे व शिकवण्याचे मंत्र शिक्षकांना अवगत असावे यासाठी  जिल्हा परिषद चंद्रपूर व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूरच्या  वतीने  शिक्षकांना समृद्ध करण्यासाठी विविध विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
लॉकडाऊन व संचारबंदीमुळे शाळांना व शिक्षकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा सर्वांसाठी आव्हानात्मक काळ आहे. अशा  काळात शिक्षकांनी अधिक क्रियाशील असणे गरजेचे आहे. येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शिक्षकांनी अधिक सक्षम व्हायला हवे.
या ऑनलाईन वेबिनारमध्ये इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी ही विशेष पर्वणी आहे. इंग्रजी विषयाची भीती व त्याविषयी उदासीनता बघता शिक्षकांमध्ये या विषयासंबंधी अधिक आत्मविश्वास यावा व इंग्रजी वर्ग व भाषा सहज बोलता यावी हा दुरदृष्टीकोन ठेऊन या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
असे असणार वेबिनारचे तात्पुरते वेळापत्रक:
इनअॅबलिंग स्किल्स रिसर्च अँड माय प्रोफेशन या विषयावर 30 एप्रिल रोजी दुपारी 12:30 ला डॉ.शुब्रा रॉय नागपूर हे मार्गदर्शन करणार आहे. प्लॅनिंग अॅंड मॅनेजिंग टिएजी मीटिंग या विषयावर 1 मे रोजी दुपारी 12:30 ला सुयोग दीक्षित नाशिक हे मार्गदर्शन करणार आहे. ऍक्टिव्हिटीज फोर लर्नर या विषयावर 2 मे रोजी दुपारी 12:30 ला संदीप शेळवाळे मुंबई हे मार्गदर्शन करणार आहे. रिसर्च अँड माय प्रोफेशन या विषयावर 4 मे रोजी दुपारी 12:30 ला डॉ.आशिष लिंगे नागपूर हे मार्गदर्शन करणार आहे. लर्निंग बाय डिस्कवरी या विषयावर 5 मे रोजी दुपारी 12:30 ला डॉ.अनिता शर्मा शिमला हे मार्गदर्शन करणार आहे. अंडरस्टँडिंग हाऊ स्टुडंट्स लर्न या विषयावर 6 मे रोजी दुपारी 12:30 ला नितू बावडेकर कोल्हापूर हे मार्गदर्शन करणार आहे. लर्निंग प्रणाऊनसेशन इन फन वे या विषयावर 7 मे रोजी दुपारी 12:30 ला दिपक मुंबई हे मार्गदर्शन करणार आहे. लेस्ट टॉक टुगेदर या विषयावर 8 व 9 मे रोजी दुपारी 12:30 ला दीपिका गोडे नागपुर व शंकर दिगदेवतुलवार वरोरा हे मार्गदर्शन करणार आहे.
लर्निंग फॉरेन लैंग्वेज थेरपी याविषयावर 11 मे रोजी दुपारी 12:30 ला डॉ.वर्षा कुलकर्णी कराड हे मार्गदर्शन करणार आहे. तर टेक्नॉलॉजी फॉर टॅग कॉर्डिनेटर या विषयावर 12 मे रोजी दुपारी 12:30 ला नदीम खान भंडारा हे मार्गदर्शन करणार आहे. हे वेबिनार झूम कॉलिंग च्या माध्यमातून होणार आहे.
या वेबिनारमध्ये सुलभक म्हणून मुंबईपुणेकोल्हापूरनागपूरनाशिकभंडारा व शिमला येथून काम बघणार आहेत. शिक्षकांसाठी ही संधी उपलब्ध करून देणारा चंद्रपूर हा महाराष्ट्रात पहिला जिल्हा आहे. शिक्षकांनी या सत्रांचा लाभ घ्यावाअसे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे व प्राचार्यजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,चंद्रपूर डॉ.विलास पाटील यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment