Search This Blog

Friday 17 April 2020

सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना ईआर-1 मध्ये मुदतीत सादर करावी : भैय्याजी येरमे


चंद्रपूर,दि. 17 एप्रिल: जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापणांनी  सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा1959 व नियम 1960 च्या कलम 4(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय निमशासकीय,तसेच कलम 5(2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणा-या आस्थापणांना त्यांच्या आस्थापणेवर असणा-या सर्व कर्मचा-यांची पुरुष,स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीसविषयांकित कायद्यातील तरतुदीनुसार विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.
मार्च 2020 अखेर संपणा-या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,प्रशासकीय भवनपहीला माळा.हॉल क्र.5/6 चंद्रपूर या कार्यालयाव्दारे चालू असूनया सर्व आस्थापणांनाकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.या सर्व आस्थापणांना या कार्यालयाकडून यापूर्वीच युझर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करावा व आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.
सदरील तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख दि. 30 एप्रिल 2020 ही आहे.याची सर्व आस्थापणांनी नोंद घ्यावी व हे तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे व कायद्याचे अनुपालन करुन सहकार्य करावे. प्रत्येक आस्थापणेने आपला नोंदणी तपशील (एम्प्लॉयर प्रोफाइल) देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावाअसे आवाहन सहाय्यक आयुक्तजिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
यासंदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास chandrapurrojgar@gmail.com व asstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in  या ई-मेल आयडीवर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईलअसेही त्यांनी सुचित केले आहे.
000000

No comments:

Post a Comment