Search This Blog

Wednesday, 15 April 2020

रोटरी क्लबकडून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 पीपीई कीट


चंद्रपूर,दि.15 एप्रिल: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक स्वयंसेवी संस्था प्रशासनाला मदत करण्यासाठी पुढे येत आहे. रोटरी क्लबकडून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 पीपीई कीट जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेजिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डीजिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोडरोटरी क्लबचे डिस्ट्रिक गव्हर्नर राजेंद्र भामरेअसिस्टंट गव्हर्नर अरुण तिखेरोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्षा स्मिता ठाकरेचांदा फोर्ट रोटरीचे प्रेसिडेंट उपागंलावाररोटरी क्लब हिराईच्या प्रेसिडेंट रिया उत्तरवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यासाठी डॉक्टरांना जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) सुटची आवश्यकता असते. ही आवश्यकता लक्षात घेऊन रोटरी क्लबकडून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 पीपीई कीट जिल्हा प्रशासनाला सुपूर्त करण्यात आले.
00000

No comments:

Post a Comment