Search This Blog

Saturday 4 April 2020

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत प्रतीव्यक्ती 5 किलो तांदूळ वाटप


चंद्रपूर तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी
अन्नधान्य वितरण होणार
चंद्रपूरदि. 4 एप्रिल: कोरोना (कोविड-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी अन्नधान्य वितरण होणार आहे. अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे चंद्रपूर तालुका पुरवठा विभागाने दिली आहे.
अशी असणार अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया:
यापूर्वी शासनाच्या 3 महिन्याचे अन्नधान्य एकत्रित वाटपाच्या सूचना होत्या तथापि आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजनेअंतर्गन मोफत तांदूळ उपलब्ध करुन दिल्यामुळे लाभार्थ्यांना माहे एप्रिल,मे व जुन 2020 साठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत दिलेल्या अन्नधान्याचे त्या- त्या महिन्यात वाटप होईल.
माहे- एप्रिल 2020 मध्ये अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना नियमित नियतन वाटप होईलई-पॉस मशीनवर एप्रिल2020 साठी वितरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजनेअंतर्गत देण्यात आलेल्या फक्त तांदळाचे (गहू नाही) लाभार्थ्यांना ई-पॉस द्वारे मोफत वितरण करण्यात येईल. सदर तांदळाचे वाटप करतांना लाभार्थ्यांना त्या महिन्यासाठी नियमित अन्नधान्याची उचल केली आहे.याची खातरजमा करण्यात येईल. मोफत वितरण जरी केले तरी दुकानदाराने पावती सांभाळुन ठेवावी. लाभार्थ्यांस पावती देऊ नयेतिचे रेकार्ड म्हणून जतन करावे.तहसिल कार्यालयात जमा करावी. तसेच लाभार्थ्याचे मोबाईल नंबर लिहून घ्यावे.
अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना देखील प्रती सदस्य प्रती माह-5 किलो याच परिमाणात मोफत तांदूळ वितरीन करण्यात येईल. उदा. अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुदयेय असलेल्या नियमित 35 किलो अन्नधान्यांचे वितरण केल्यानंतरसदर अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकेतील सदस्य संख्येनुसार प्रतिसदस्य 5 किलो तांदळाचे मोफत वितरण होईलम्हणजेच अन्योदय अन्न योजना शिधापत्रिकवर 1 सदस्य असल्यास 5 किली2 सदस्य असल्यास 10 किलो याप्रमाणे तांदळाचे मोफत वितरण करण्यात येईल.
प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना देखील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुद्येय असलेल्या 5 किलो प्रतीसदस्य या परिमाणात तांदळाचे  वितरण केल्यानंतर प्रती सदस्य 5 किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येईल.उपरोक्त मोफत अतिरिक्त तांदळाचे वितरण ई-पॉसद्वारेच वाटप होईल.
माहे मे आणि जुन 2020 मध्ये त्या-त्या महिन्याचे विहित नियतन आणि अतिरिक्त मोफत तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध होईल.
चंद्रपूर तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल करावी,असे आवाहन तालुका पुरवठा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment