Search This Blog

Tuesday 14 April 2020

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साजरी


चंद्रपूरदि.14 एप्रिल: जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर, नायब तहसिलदार वाढई यांनीही  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment