Search This Blog

Tuesday 7 April 2020

दिव्यांग,ज्येष्ठ नागरिक, निराधार व्यक्तींसाठी तालुकास्तरीय कोरोना सहाय्य दिव्यांग मदत कक्ष स्थापन


चंद्रपूर दि.7 एप्रिल :अस्थिव्यंग,कर्णबधिरमूकबधिर,अंध,मतिमंद अशा दिव्यांगाच्या जगण्याचा प्रश्न कोरोनाव्हायरस मुळे अधिक जटिल झाला आहे. आधीच नियतीने दिव्यांगत्व व लादल्याने नशिबी जगण्याचा संघर्ष निर्माण झाला असून त्यात कोरोना मुळे दिव्यांगा पुढे संकटांचा डोंगर उभा झाला आहे. शासनाने दिव्यांगाकरिता नोडल अधिकारी (दिव्यांग) म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी (जि. प.) यांची नेमणूक केली आहे. जिल्ह्याच्या 11 तालुक्यात दिव्यांगज्येष्ठ नागरिकनिराधार व्यक्तींसाठी तालुकास्तरीय कोरोना सहाय्य दिव्यांग मदत कक्ष स्थापन केले आहे.
         कोरोना विशालच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू केला असल्याने अनेकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे यादृष्टीने मा. आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालयमहाराष्ट्र राज्यपुणे यांनी विशेष दिशानिर्देश दिले आहेत. त्यातून केवळ दिव्यांग नव्हे तर जेष्ठ नागरिकनिराधार व्यक्ती आदींच्या समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व मुख्य कार्यकारी अधिकारी (जि. प.) राहुल कर्डिले यांनी अशा विशेष घटकासाठी सोयीसुविधा पुरविण्याबाबत  तालुक्याचे तहसीलदारगटविकास अधिकारी (पं.स.)मुख्याधिकारी (नगरपरिषद/नगरपंचायत), आयुक्त (महानगरपालिका) यांना निर्देश देण्यात आले आहे.
          दिव्यांग व्यक्तीनिराधार व ज्येष्ठ नागरिक यांना काही मदत हवी असल्यास जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे यांना 9004008216,07172-251597 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी (जि.प.) तथा नोडल अधिकारी (दिव्यांग) सुनील जाधव यांनी आपत्कालीन स्थितीमध्ये सापडणाऱ्या नागरिकांसाठी 11 तालुक्यात कोरोना सहाय्य दिव्यांग मदत कक्ष उघडले आहे या मध्ये जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश असून 11 नोडल अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर तालुक्यासाठी सौ. एम.ए. शास्त्रकार संपर्क क्र.9552143129 व निलेश पाझारे संपर्क क्र.9766134400,8806713386
मुल तालुक्यासाठी  के. एस.दुर्गे संपर्क क्र.9923826676सावली तालुक्यासाठी एस. चौथाले संपर्क क्र.9921320829गोंडपिपरी तालुक्यासाठी पी. ए.सातपुते 9422946828चिमूर तालुक्यासाठी पी.आर. कामडी संपर्क क्र.8378064705,वरोरा तालुक्यासाठी आर.नलगीटवार संपर्क क्र.9673574148भद्रावती तालुक्यासाठी जी.एल. भोयर संपर्क क्र.9423595002बल्लारपूर ,राजुराकोरपणाजिवती तालुक्यासाठी निलेश पाझारे संपर्क क्र. 9766134400,8806713386 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000  

No comments:

Post a Comment