Search This Blog

Thursday 23 April 2020

कोविड -19 सहाय्यता निधीला जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरूच


चंद्रपूर, दि. 23 एप्रिल: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास  उत्तम प्रतिसाद मिळत असून या आवाहनास  प्रतिसाद देत अनेक संस्था,व्यक्ती यांनी जिल्हा सहायता निधीच्या खात्यात देणग्या देणे सुरू केले आहे.
आज प्रामुख्याने महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था नवरगावच्या वतीने रु.21 हजारतालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था नागभीड,गजानन मजूर सहकारी संस्था वडाळा,संत गजानन महाराज मजूर सह.संस्था पाचगाव,ग्रामीण विकास बँक कर्मचारी सह.पतसंस्थाच्या वतीने प्रत्येकी रु.11 हजारसंजय वडस्कर यांच्याकडून रु.11 हजार 111भारतीय सुदर्शन समाज महासंघ चंद्रपूर यांच्याकडून रु.15 हजार तर रोशन राठोड यांच्याकडून रु.15 हजाराचा धनादेश,कृषक नगर महिला मंडळ चंद्रपूर कडून 16 हजार 250 रुपयांचा धनादेश जिल्हा सहायता निधीस देण्यात आला.
 त्यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये गुरुदेव सेवा मंडळ,चंद्रपूर यांनी 51 हजार रुपये, फरहत रहुल्ला बेग यांच्याकडून रु.1 लक्ष,अश्विनी किशोर गिऱ्हे व किशोर अशोक गिऱ्हे यांचेकडून रु.51 हजार तर अशोक डोईफोडे चंद्रपूर यांच्याकडून रु.11 हजाराचा धनादेश देण्यात आला.
कोरोना: मदत करायचीय ? 'याबँक खात्यात पैसे जमा करा !
      कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजककंपन्यांचे प्रमुखस्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment