Search This Blog

Friday 10 April 2020

जिल्ह्यात 1 हजार 414 शाळेमध्ये शालेय पोषण आहाराच्या शिल्लक साहित्याचे वितरण


चंद्रपूर,दि. 10 एप्रिल: राज्यातील विद्यार्थ्यांचे पोषण होण्याच्या दृष्टीने  आहार देणे आवश्यक असल्याने शालेय शिक्षण विभागाने शाळास्तरावर शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शिल्लक असलेला तांदुळडाळी व कडधान्याचे विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याचे आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हयात 1 हजार 414 शाळेमध्ये शालेय पोषण आहाराच्या शिल्लक साहित्याचे वितरण केले त्यामध्ये 1 लाख 5 हजार 901 विद्यार्थी, पालक यांना लाभ देण्यात आला. अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकात अधीक्षक वर्ग-2 शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर विशाल देशमुख यांनी दिली आहे. सदरचे शिल्लक साहित्य गर्दी न करता सोशल डिस्टन्ससिंगचे तत्व पालन करुन वितरीत करण्यात आले आहे.
साहित्य वितरण करण्याकरिता तालुकास्तरीय यंत्रणाबिट, केंद्रस्तरीय यंत्रणाशाळास्तरीय यंत्रणायांनी विद्याथ्यांचे हित हे पवित्र उदिष्ट साध्य करण्यासाठी कोराना सदृश्य परिस्थितीत सुध्दा येणाऱ्या अडचणीची सामना करुन विद्यार्थ्यांना, पालकांना साहित्य वितरीत केले. या दिलेल्या योगदानासाठी शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषदचंद्रपूर यांच्यावतीने आभार व्यक्त केलेले आहे.
भविष्यात ज्या शाळांचे साहित्य वाटपाबाबत नियोजन आहेत्यांनी शाळा व्यवस्थापन समिती मार्फत निर्णय घ्यावा. तसेच गांव कोरोना समिती यांना विश्वासात घेवून शाळेमध्ये गर्दी होणार नाहीसोशल डिस्टन्ससिंगचा भंग होणार नाहीयाची काटेकोर पालन करुन या कोरोना सदृश्य परिस्थितीतून बाहेर निघण्याकरिता सुरु असलेल्या लढाई जिंकण्याकरिता सर्वांनी सहकार्य करावेअशा सुचना जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या आहेत.
00000

No comments:

Post a Comment