Search This Blog

Saturday 18 April 2020

महाइन्फोकोरोना:कोरोना संदर्भात अधिकृत माहिती


अफवांपासून दूर राहामिळवा अधिकृत आणि खरी माहिती
चंद्रपूर,दि. 18 एप्रिल: कोरोना विषाणूने सर्व जगभरात थैमान घातले आहे. परंतुदेशात व राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये.यासाठी केंद्र व राज्य शासनाने महत्त्वाची पाऊले उचलली असून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. याच उपाययोजनांची एकत्रित अधिकृत व खात्रीशीर माहिती पुरविण्यासाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने  https://www.mahainfocorona.in या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.
समाज माध्यमांद्वारे अफवा पसरून चुकीची माहिती प्रसारित करीत असतात. परंतुया अफवांना बळी न पडता व अनधिकृत चुकीच्या माहितीवर अंकुश ठेवण्यासाठी नागरिकांना अधिकृत व खात्रीशीर माहिती  तात्काळ व अद्ययावत मिळण्यासाठी, महाराष्ट्र शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि महाराष्ट्र या शीर्षकाखाली महाइन्फोकोरोना हे संकेतस्थळ सुरु केलेले आहे.
हि मिळणार माहीती:
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात सद्यस्थितीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व शासनाने केलेली कार्यवाहीपरराज्य व पर जिल्ह्यातील अडकलेल्या नागरिकांसाठी स्थापन केलेले निवारा गृहाविषयीची माहितीराज्यातील जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाकोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारीराज्य शासनाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णयजिल्हानिहाय रुग्णालय व त्यांची क्षमताराज्य, जिल्हानिहाय मदतीसाठी आवश्यक दूरध्वनीजिल्हानिहाय सार्वजनिक सुविधानागरिकांच्या शंका व निरसनकेंद्र व राज्य शासनाच्या कोरोना संदर्भातील महत्त्वपूर्ण संकेतस्थळे इत्यादींची अधिकृत खात्रीशीर व एकत्रित माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
अधिकृत व अद्ययावत माहिती:
राज्यात व जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संदर्भातील अद्ययावत माहिती. जसे ग्राफिकच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांची संख्या, राज्य शासनाने घेतलेले निर्णयजिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी, सोयी सुविधेची (शिवभोजन,निवारागृह इत्यादी) जिल्हानिहाय आकडेवारी यांची वेळोवेळी अद्ययावत माहिती या संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहे.
त्याचबरोबर संकेतस्थळावरील घडामोडी या वेगळ्या विभागामार्फत मुख्यमंत्रीइतर मंत्रीविभागीय आयुक्तजिल्हाधिकारी यांच्या पत्रकार परिषदांची व बैठकांची माहिती, राज्यात व जिल्ह्यात घडणाऱ्या ठळक घडामोडी यांची अद्यावत माहिती  मिळणार आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या माहितीची वेगळी लिंक तयार केली आहे. या लिंकच्या माध्यमातून नागरिक संबंधित माहिती डाऊनलोड सुद्धा करू शकतील.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ची वेगळी लिंक:
महाइन्फोकोरोना या संकेत स्थळावर इच्छुक दानशूर लोकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीला  मदत करायची असेल तर यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ही वेगळी लिंक तयार केली आहे. तसेच यासाठी क्यूआर कोड सुद्धा संकेतस्थळाला उपलब्ध आहे. या माध्यमातून इच्छुकांना मदत करता येणार आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता खरी आणि अधिकृत माहितीसाठी   https://www.mahainfocorona.in या संकेत स्थळाला नियमित भेट देवून तसेच केंद्र व राज्य शासनाच्याजिल्हा प्रशासनाच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांना फॉलो कराअसे आवाहन राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने केले आहे.
000000

No comments:

Post a Comment