Search This Blog

Sunday 5 April 2020

बँक ऑफ महाराष्ट्र, चंद्रपूर अंचलच्यावतीने सॅनिटायझरचे वितरण


चंद्रपूर,दि.5 एप्रिल: कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रसार होऊ नये व सुरक्षिततेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र चंद्रपूर अंचलच्यावतीने पोलीस  अधिकारी व कर्मचाऱ्यांना  सॅनिटायझरचे मोफत वितरण दिनांक 5 एप्रिल रोजी करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश हाकेबँक ऑफ महाराष्ट्रचंद्रपूर अंचलचे अंचल प्रबंधक प्रफुल पालीवाल तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचंद्रपूरचे उपअंचल प्रबंधक व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

वाहतूक नियंत्रण शाखा,पोलीस मुख्यालय व रामनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी घरीच रहावे व काळजी घेण्याचे आवाहन केले.
00000

No comments:

Post a Comment