Search This Blog

Thursday 30 April 2020

शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा: डॉ.उदय पाटील


चंद्रपूर,दि.30 एप्रिल: उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहिम अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजना सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता इच्छुक शेतकऱ्यांकडून बी.बी.एफ यंत्रपेरणी यंत्र सीड ड्रील) व धान रोवणी यंत्र (पॅडी ट्रान्सप्लांन्टर) अनुदानावर खरेदी करण्यासाठी विहीत नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जाचा नमुना संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयात व या विभागाचे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदर अर्जात यथायोग्य परिपुर्ण माहिती भरूनअर्ज आपले गाव स्तरावरील कृषि सहाय्यक किंवा कृषि पर्यवेक्षक किंवा मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी यांचेकडे सादर करावेत.
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावरून याबाबत माहिती घ्यावी. शेतकऱ्यांनी सदर यंत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment